शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
5
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
6
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
7
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
8
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
9
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
10
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
11
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
12
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
13
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
14
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
15
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
16
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
17
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
18
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
19
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
20
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

रात्रीच्या वेळेतच होतो निम्म्याहून अधिक व्यवसाय; हॉटेलची वेळ साडेअकरापर्यंत वाढवा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 2:21 PM

सध्याची दहाची वेळ हॉटेल आणि बारसाठी पुरेशी नाही : हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार असोसिएशन

ठळक मुद्देहॉटेल-रेस्टॉरंटची वेळ सकाळी साडेआठ ते रात्री साडेअकरा करावी

पिंपरी : रात्रीच्या वेळेतच हॉटेल , रेस्टॉरंटचा निम्म्याहून अधिक व्यवसाय होतो. मद्यालयामध्ये (परमिट बार) तर ऐंशी टक्के व्यवसाय हा रात्रीच्या वेळी होतो. त्यामुळे सध्याची दहाची वेळ हॉटेल आणि बारसाठी पुरेशी नाही. ती किमान रात्री साडेअकरापर्यंत वाढवावी अशी मागणी पिंपरी चिंचवड आणि पुणे हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

कोरोनाचा (कोविड १९) प्रसार रोखण्यासाठी मार्च महिन्यात टाळेबंदी जाहीर करण्यात आली. टाळेबंदीच्या अखेरच्या टप्प्यात हॉटेल आणि बारला एक ऑक्टोबर पासून सशर्त परवानगी दिली आहे. कोविड पूर्वी रात्री साडेबारापर्यंत हॉटेल आणि बारला परवानगी होती. आता सकाळी साडेआठ ते रात्री दहा या वेळेत हॉटेल सुरू राहतील. तसेच पन्नास टक्के क्षमतेने हॉटेल सुरू ठेवण्याचे बंधन घातले आहे. राज्यात नुकतीच ठाणे, वसई, विरार येथे हॉटेल, बारची वेळ रात्री साडेअकरा वाजेपर्यंत वाढविली आहे. त्या प्रमाणे वेळ वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांची भेट घेऊन हॉटेलची वेळ वाढविण्याची मागणी केली. संघटनेचे अध्यक्ष पद्मनाभ शेट्टी, कार्याध्यक्ष गोविंद पानसरे, उपाध्यक्ष रमेश तापकीर, सहसचिव सतीश तेलंग, बापूसाहेब फटांगरे या वेळी उपस्थित होते. महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांच्याशी बोलून त्या बाबतचा निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती संघटनेचे सचिव गोविंद साळवे यांनी दिली.

शहरात शाकाहारी आणि मांसाहारी हॉटेलमध्ये दिवसभरात होणाऱ्या एकूण व्यवसाय पैकी साठ टक्के व्यवसाय रात्री आठ नंतर होतो. तर शनिवार-रविवार वगळता बारचा ऐंशी टक्के व्यवसाय रात्रीच होतो. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारला रात्री साडेअकरा पर्यंत परवानगी द्यावी असे पिंपरी चिंचवड हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे सचिव गणेश कुदळे म्हणाले.

नोकरी आणि व्यवसायामुळे हॉटेल आणि बारमध्ये रात्रीच्या वेळेतच गर्दी होते. दहा वाजता बंद केल्यास आर्थिक गणित विस्कळीत होत आहे. त्यामुळे मुंबई प्रमाणे पुण्यातही रात्रीची वेळ किमान साडेअकरापर्यंत  वाढवून दिली पाहिजे, असे पुणे हॉटेल, रेस्टॉरंट अँड बार असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी म्हणाले. 

-------

हॉटेल आणि वेळ

कोविडपूर्वी  : रात्री साडेबारा वाजता सर्व हॉटेल आस्थापना बंद

सध्याची वेळ : रात्री दहा वाजता सर्व हॉटेल आस्थापना बंद

मागणी : हॉटेल-रेस्टॉरंटची वेळ सकाळी साडेआठ ते रात्री साडेअकरा करावी

बार : सकाळी साडेअकरा ते रात्री साडेअकरा करावी 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडhotelहॉटेलbusinessव्यवसायState Governmentराज्य सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या