महाशिवरात्रीनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी पीएमपीच्या जादा बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 05:18 IST2018-02-11T05:18:30+5:302018-02-11T05:18:37+5:30

महाशिवरात्रीनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) मार्फत विशेष बसेसची व्यवस्था केली जाणार आहे. या बस स्वारगेट, नेहरू स्टेडियम, मनपा भवन येथून सोडल्या जाणार आहेत.

More buses of PMP for the convenience of devotees during Mahashivratri | महाशिवरात्रीनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी पीएमपीच्या जादा बस

महाशिवरात्रीनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी पीएमपीच्या जादा बस

पुणे : महाशिवरात्रीनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) मार्फत विशेष बसेसची व्यवस्था केली जाणार आहे. या बस स्वारगेट, नेहरू स्टेडियम, मनपा भवन येथून सोडल्या जाणार आहेत.
महाशिवरात्रीनिमित्त दि. १३ फेब्रुवारी रोजी ‘पीएमपी’कडून सोमेश्वरवाडी (पाषाण), बनेश्वर (नसरापूर), निळकंठेश्वर (रूळे) व धायरेश्वर मंदिर (धायरी) या ठिकाणी जाण्यासाठी विशेष बस सोडल्या जाणार आहेत. स्वारगेट ते बनेश्वर, नेहरू स्टेडियम ते रूळेगाव, मनपा भवन ते पाषाण आणि स्वारगेट नटराज हॉटेल ते धायरी हे मार्ग असतील. स्वारगेट बसस्थानकातून पहाटे ३.३० वाजता रुळेगावपर्यंत तर बनेश्वरसाठी सकाळी ६ वाजता पहिली बस सोडली जाणार आहे. मनपा भवन येथून सोमेश्वरवाडीसाठी पहिली बस सकाळी ६ वाजता सोडली जाणार आहे. रूळेगाव याठिकाणी विशेष बससेवा देण्यात येणार असल्याने या मागावरील प्रवाशांसाठी नेहमीच्या दरापेक्षा २५ टक्के जादा दराची आकारणी करण्यात येईल. पासधारकांना या मार्गावर सवलत मिळणार नाही, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

Web Title: More buses of PMP for the convenience of devotees during Mahashivratri

टॅग्स :Puneपुणे