शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

हवेली परिसरातील ५० हुन अधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गुऱ्हाळ व्यापाऱ्याने घातला लाखोंचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 16:21 IST

ऊसाचे पैसे परस्पर खर्च करुन शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार

पंढरीनाथ नामुगडे-पुणे (कदमवाकवस्ती) : कोरोनामुळे शेतकऱ्यांसह सर्व घटक अडचणीत आहेत. फळबागा व तरकारीने शेतकऱ्यांना हात न दिल्याने ऊस हेच हक्काचे पीक वाटत होते. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक गुऱ्हाळे दौंड तालुक्‍यात आहेत. मात्र दौड तालुक्यातील एका व्यापाऱ्याने कदमवाकवस्ती,लोणी काळभोर यासह पन्नासहुन अधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाखोंचा गंडा घातल्याचा धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा फसवणुकीचा प्रकार मागील तीन ते चार महिन्याच्या काळात घडलेला आहे

अर्जुन गायकवाड, गणपत चावट, बाबुलाल मोमीन, प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र गायकवाड, रामभाऊ गायकवाड, शंकर खोले फसवणुक झालेल्या प्रमुख ऊस उत्पादक शेतकऱ्यांची नावे आहेत. 

थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना मागील दहा पासुन बंद असल्याने, पु्र्व हवेलीमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दौंड व शिरुर तालुक्याताल साखऱ कारखान्यावर अंवलबुन रहावे लागते. लोणी काळभोर, उरुळी कांचन परीसरात गुऱ्हाळे चालु असली तरी,पूर्व हवेलीमधील ऊसाचे क्षेत्र मोठे असल्याने दौंड तालुक्यातील गुऱ्हाळ चालकाचे अनेक दलाल ऊसासाठी तालुक्यात फिरत आहेत. अशाच एका व्यापाऱ्याने शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे परस्पर खर्च करुन शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार पुढे आला आहे. 

 याबाबत कदमवाकवस्ती येथील ऊस उत्पादक शेतकरी अर्जुन गायकवाड म्हणाले, लॉकडाऊन काळात दौंड तालुक्यातील एका व्यापाऱ्याने कदमवाकवस्ती परिसरातील पन्नासहुन अधिक शेतकऱ्यांचा ऊस गुऱ्हाळाला नेला होता. वरील सर्वच शेतकऱ्या्ंचे ऊसाचे पैसे वेळेवर मिळाल्याने, आमच्यासारख्या पंचवीसहुन अधिक शेतकऱ्यांनी मागील काही महिन्याच्या काळात संबंधित व्यापाऱ्याला ऊस दिला होता. मात्र नेलेल्या ऊसाचे पैसे देण्यास संबधित व्यापाऱ्याने पैसे देण्यास टाळाटाळ सुरु केली आहे. वारंवार मागणी करुनही, व्यापारी उडवाउडवीची उत्तरे देऊन शेतकऱ्यांना भेटण्याचे टाळत आहे. व्यापाऱ्याने दौंड तालुक्यातील ज्या ज्या गुऱ्हाळ चालकांना आमचा ऊस दिला अशा सर्व गुऱ्हाळ चालकांची भेट घेतली असता, व्यापाऱ्याने पैसे ऊसाचे पैसे परस्पर उचलल्याची माहिती मिळत आहे. 

अनेक गावातील शेतकऱ्यांचा ऊस या व्यापाऱ्याने नेला असल्याची माहिती मिळत आहे. वारंवार संपर्क साधुनही व्यापारी भेटत नसल्याने फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.- अर्जुन गायकवाड.

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेfraudधोकेबाजीFarmerशेतकरीPoliceपोलिस