शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

पीएमपीच्या ताफ्यात आणखी ३० मिडी बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:57 AM

महिलांसाठीच्या ३० तेजस्विनी बसपाठोपाठ पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात आणखी ३० मिडी बस दाखल झाल्या आहेत.

पुणे : महिलांसाठीच्या ३० तेजस्विनी बसपाठोपाठ पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात आणखी ३० मिडी बस दाखल झाल्या आहेत. त्यांपैकी १२ बस मार्गावर आल्या असून, १८ बसच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.या बसही पुढील दोन-तीन दिवसांमध्ये मार्गावर येणार असल्याची माहिती पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी दिली.‘पीएमपी’च्या ताफ्यात एकूण २०० मिडी बस येणार असल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे. त्यापैकी ३० बस महिला दिनापासून मार्गावर आल्या आहेत. तेजस्विनी नावाने सुरू करण्यात आलेल्या या बस ‘महिला विशेष’ म्हणून मार्गावर धावत आहेत.या बसना गर्दीच्या वेळी महिला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो. आता आणखी बस ताफ्यात येऊ लागल्या आहेत. महिनाअखेरपर्यंत एकूण ९९ बस मार्गावर आणण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. सध्या ३० महिला विशेष बससह दोन दिवसांपूर्वी आणखी १२ बस मार्गावर धावत आहेत, तर कंपनीकडून आणखी १८ बस पीएमपीला मिळाल्या आहेत. या बसच्या नोंदणीचे काम प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून केले जात आहे.