शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
3
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
4
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
5
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
6
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
7
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
8
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
9
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
10
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
11
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
12
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
13
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
14
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
15
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
16
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
17
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
18
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
19
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
20
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

थाटामाटातल्या एका लग्नाची गोष्ट;२०० पेक्षा अधिक लोकांची उपस्थिती,कोरोनामुळे एकाचा मृत्यू तर ११ जण पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 19:38 IST

ह्या लग्नाला अनेक आजी, माजी राजकीय लोकप्रतिनिधी यांच्यासह जवळपास २०० हुन अधिक लॊकांची उपस्थिती

ठळक मुद्देवर पित्यासह हॉटेल व्यवस्थापकावर नारायणगाव पोलिसांनी केला गुन्हा दाखल

नारायणगाव : लॉकडाऊन काळात नाही नाही म्हणता बरेच लग्न सोहळे पार पडले. कोरोनाची गंभीर दखल घेत काही जणांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे कटाक्षाने पालन करत घरच्या घरी चार दोन लोकात लग्न उरकले. तर कुणी प्रशासनाच्या निर्बंधांना धाब्यावर बसवत अगदी मोठ्या थाटामाटात लग्न सोहळे पूर्ण केले. असेच एक लग्न नारायणगाव परिसरात आले होते. ह्या लग्नाला अनेक आजी, माजी राजकीय लोकप्रतिनिधी यांच्यासह जवळपास २०० हुन अधिक लॊकांची उपस्थिती होती. मात्र दणक्यात बार उडवलेल्या ह्या लग्नाने आता आयोजक, वर- वधू  कुटुंबांसह उपस्थित असणाऱ्या सर्वांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. कारण ह्या लग्नाला उपस्थित असणाऱ्यांपैकी अकरा जण कोरोनाबाधित निघाले असून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असल्याची समोर आली आहे.  उद्या आणखी 12 जणांचे घेण्यात येणार आहे.

याबाबत नारायणगाव पोलिस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल दिनेश साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, सह्याद्री भिसे (रा. येडगाव ता. जुन्नर) व हिवरे तर्फे नारायणगाव हद्दीतील ओसारा हॉटेल मालकासह व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  लग्न सोहळ्यास मर्यादित लोकांची दिलेली प्रशासनाच्या परवानगीस वाटण्याचा अक्षता दाखवित २०० हुन अधिक लोकांच्या उपस्थित लग्न सोहळा  आयोजित केला होता.

याबाबत  सहाय्यक पोलीस निरीक्षक डि. के. गुंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, सह्याद्री भिसे यांच्या मुलाचा विवाह सोहळा दि. १३ ऑगस्ट रोजी होता. या लग्न सोहळ्याकरिता सह्याद्री भिसे यांना पोलीस स्टेशनचे परवानगीनुसार जिल्हाधिकारी यांच्याकडील आदेशान्वये २० लोक हजर रहावे याबाबत नमुद केले होते. परंतू, सह्याद्री भिसे यांनी त्यांच्याकडील लग्न कार्यास २० पेक्षा जास्त लोक जमविले व ओसारा हाँटेलचे व्यवस्थापक यांनी मंगल कार्यालयात २० पेक्षा जास्त लोकांची गर्दी जमविली. त्यामुळे सह्याद्री भिसे व ओसारा हाँटेलचे व्यवस्थापक यांनी परवानगी मध्ये दिलेल्या सुचनांचे पालन केले नाही. व तेथे येणाऱ्या लोकांसाठी कोणत्याही आरोग्याच्या सुविधा उपलब्ध केले नसल्याचे दिसले व इतरांचे आरोग्य धोक्यात येईल असे वर्तन केले. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

टॅग्स :narayangaonनारायणगावmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या