शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

शिवापूर टोलनाका बंद करण्यासाठी १६ फेब्रुवारीला धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 8:15 PM

टोलनाका हलविण्याचा निर्णय होईपर्यंत शिवापूर टोलनाक्याजवळ धरणे धरण्यात येणार

ठळक मुद्देशिवापूर टोलनाका पीएमआरडीएच्या हद्दीबाहेर हलवावा अशी मागणी

पुणे : पुणे-सातारा रस्त्यावरील शिवापूर टोलनाका हा भ्रष्ट्राचाराचे कुरण बनला आहे. पुणे शहरातील नागरिकांना अर्थात एमएच १२ पासिंग गाड्यांना टोल वसुलीसाठी मुख्य ‘सावज’ बनविणारा शिवापूर टोलनाकापीएमआरडीएच्या हद्दीबाहेर हलवावा या मागणीसाठी शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीच्यावतीने रविवार (दि़१६ फेब्रुवारी ) सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.टोलनाका हलविण्याचा निर्णय होईपर्यंत शिवापूर टोलनाक्याजवळ धरणे धरण्यात येणार आहे. या काळात एकाही चारचाकी गाडीला टोलवसुली करू दिली जाणार नाही, असे समितीचे निमंत्रक ज्ञानेश्वर दारवटकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी पुणे महापालिकेचे सभागृह नेते धीरज घाटे, मनसेचे गटनेते वसंत मोरे, माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे आदी उपस्थित होते. रविवारी होणाऱ्या आंदोलनात सर्व पक्षीय नगरसेवक, स्थानिक  व परिसरातील आमदार खासदार उपस्थित राहणार असल्याचे सांगून, त्यांनी पुणेकर नागरिकांनी रविवारी या रस्त्यावरील प्रवास शक्यतो टाळावा असे आवाहनही केले.दारवटकर म्हणाले की, भोर, वेल्हा, हवेली, पुरंदर या ठिकाणच्या धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे, ऐतिहासिक ठिकाणे येथे जाणाºया पुणेकरांची संख्या मोठी असल्याने केवळ त्यांच्या वाहनांना ‘सावज’ बनविण्यासाठी हा टोलनाका शिवापूर येथे ठेवण्यात आला आहे. १४० कि़मी़अंतराच्या सहा पदरी रस्ता उभारणीसाठी मेसर्स रिलायन्स युटीलिटी इंजिनिअर्स तर्फे मे़पी़एस़टोल रोड प्रा़लि़ यांना टोल वसुलीचा ठेका देण्यात आलेला आहे. सदर रस्ता २०१३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असताना अद्यापही पूर्ण झालेला नाही़ सन २०१० पासून या रस्त्यावर तब्बल एक हजार बळी अपघातात गेले आहेत. इंडियन रोड काँग्रेसच्या मानकाप्रमाणे हा रस्ता झाला नसल्याने २५ नोव्हेंबर,२०१९ रोजीच एनएचएआयने सदर ठिकाणची टोलवसुली बंद करण्याची शिफारस केली असल्याचे त्यांनी सांगून, या प्रकल्पाबाबत सीबीआयकडे २२ जानेवारी,२०२० रोजी तक्रार दाखल करण्यात आल्याचे सांगितले.------------टोलनाका बंद का होऊ शकला नाही यावर उपस्थित निरूस्तरशिवापूर टोलनाका हटविण्यासाठी होणाऱ्या धरणे आंदोलनात सर्वपक्षीय पदाधिकारी सहभागी होणार आहेत. आंदोलनात सहभागी होणाऱ्या पक्षांचेच सन २०१० पासून विविध काळात केंद्रात व राज्यात सरकार असताना, टोलनाका बंद करण्यासाठीचे प्रयत्न पदाधिकाऱ्यांनी आपल्या पक्षांकडे का केले नाहीत असा प्रश्न यावेळी पत्रकारांनी उपस्थित केला असता, सर्वच उपस्थित पदाधिकारी निरूत्तर होऊन शांत बसले.  

टॅग्स :PuneपुणेtollplazaटोलनाकाPMRDAपीएमआरडीए