शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

#Monsoon2018 पुण्यात वादळीवाऱ्यासह तर पिंपरी चिंचवडला गारांचा पाऊस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 5:42 PM

पुणे आणि परिसराला पूर्व मोसमी पावसाने झोडपले असून शहरात वादळवाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये गारांचा पाऊस पडला असून  वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली आहेत.

ठळक मुद्देपुणे, पिंपरी चिंचवडमध्ये पाऊस, उकाड्यापासून नागरिकांना दिलासा अचानक पाऊस आल्याने नागरिकांची तारांबळ, फ्लेक्स फाटले, दुचाकी घसरल्या 

पुणे, पिंपरी -चिंचवड : पुणे आणि परिसराला पूर्व मोसमी पावसाने झोडपले असून शहरात वादळवाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये गारांचा पाऊस पडला असून  वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली आहेत.शहराची उपनगरे मानण्यात येणाऱ्या वाघोली, हिंजवडी, कात्रज, नऱ्हे आंबेगाव, वारजे परिसरातही मुसळधार पाऊस सुरु आहे. 

      गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडकर हैराण झाले होते. आज सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता. दुपारी दोननंतर आकाशात ढग जमायला सुरूवात झाली. साडेतीनच्या जोरदार वादळी वारे सुरू झाले. अचानकपणे पावसास सुरूवात झाल्याने नागरिकांचा तारांबळ उडाली. वाऱ्याचा वेग वाढला. ढगांचा गडगडाटही वाढला. जोरदार पावसाला सुरूवात झाली. पावसाचे टपोरे थेंब एवढे मोठे होते की पावसापासून बचाव करण्यासाठी रस्त्यावरून चालणाऱ्यांची तारांबळ उडाली होती. महामार्गावर रस्ता निसरडा झाल्याने सव्वाचारच्या सुमारास दुचाकी घसरल्या. तर काही दुचाकीस्वार पाऊसापासून बचाव करण्यासाठी पुलाच्या अडोशाला थांबल्याचे दिसून आले. महामार्गावर रस्त्यावर वाहने घसरून पडण्याचे प्रकार घडले. चिंचवड, पिंपरीत विविध घटना घडल्या.पिंपरी चिंचवड परिसरात  निगडी, प्राधिकरण, भोसरी, चिंखली, मोहननगर, मोशी, दिघी, तळवडे, काळेवाडी, पिंपळेनिल, सौदारगर, पिंपरीगाव, रहाटणी, संततुकारामनगर, वल्लभनगर, वाल्हेकरवाडी, थेरगाव, किवळे, आकुर्डी, पुनावळे, हिंजवडी परिसरात सरी कोसळल्या. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊस