#Monsoon2018 पुण्यात वादळीवाऱ्यासह तर पिंपरी चिंचवडला गारांचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 17:42 IST2018-06-01T17:42:28+5:302018-06-01T17:42:28+5:30
पुणे आणि परिसराला पूर्व मोसमी पावसाने झोडपले असून शहरात वादळवाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये गारांचा पाऊस पडला असून वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली आहेत.

#Monsoon2018 पुण्यात वादळीवाऱ्यासह तर पिंपरी चिंचवडला गारांचा पाऊस
पुणे, पिंपरी -चिंचवड : पुणे आणि परिसराला पूर्व मोसमी पावसाने झोडपले असून शहरात वादळवाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये गारांचा पाऊस पडला असून वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली आहेत.शहराची उपनगरे मानण्यात येणाऱ्या वाघोली, हिंजवडी, कात्रज, नऱ्हे आंबेगाव, वारजे परिसरातही मुसळधार पाऊस सुरु आहे.
गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडकर हैराण झाले होते. आज सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता. दुपारी दोननंतर आकाशात ढग जमायला सुरूवात झाली. साडेतीनच्या जोरदार वादळी वारे सुरू झाले. अचानकपणे पावसास सुरूवात झाल्याने नागरिकांचा तारांबळ उडाली. वाऱ्याचा वेग वाढला. ढगांचा गडगडाटही वाढला. जोरदार पावसाला सुरूवात झाली. पावसाचे टपोरे थेंब एवढे मोठे होते की पावसापासून बचाव करण्यासाठी रस्त्यावरून चालणाऱ्यांची तारांबळ उडाली होती. महामार्गावर रस्ता निसरडा झाल्याने सव्वाचारच्या सुमारास दुचाकी घसरल्या. तर काही दुचाकीस्वार पाऊसापासून बचाव करण्यासाठी पुलाच्या अडोशाला थांबल्याचे दिसून आले. महामार्गावर रस्त्यावर वाहने घसरून पडण्याचे प्रकार घडले. चिंचवड, पिंपरीत विविध घटना घडल्या.पिंपरी चिंचवड परिसरात निगडी, प्राधिकरण, भोसरी, चिंखली, मोहननगर, मोशी, दिघी, तळवडे, काळेवाडी, पिंपळेनिल, सौदारगर, पिंपरीगाव, रहाटणी, संततुकारामनगर, वल्लभनगर, वाल्हेकरवाडी, थेरगाव, किवळे, आकुर्डी, पुनावळे, हिंजवडी परिसरात सरी कोसळल्या.