शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांचा साेमवार ठरला वाहतूक काेंडीचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 19:16 IST

साेमवारी शहरातील विविध रस्त्यांवर माेठ्याप्रमाणावर वाहतूक काेंडी झाली हाेती. या वाहतूक काेंडीमुळे वाहनचालकांना तासणतास वाहतूक काेंडीत अडकून पडावे लागले.

पुणे : साेमवारचा दिवस पुणेकरांसाठी डाेकेदुखी देणारा ठरला. सकाळपासूनच शहरातील विविध भागात माेठ्याप्रमाणावर वाहतूक काेंडी झाली हाेती. त्यामुळे वाहनचालकांना जवळचे अंतर पार करण्यासाठी अर्धा ते पाउणतास लागत हाेता. त्यामुळे सकाळी लवकर कार्यालय गाठणाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. संध्याकाळपर्यंत शहरातील वाहतूक काेंडी कायम हाेती. 

आठवडाभरापासून वरुणराजाने पुण्यात दमदार हजेरी लावली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे धरणातील पाण्यामध्ये देखील वाढ झाली आहे. असे असताना दुसरीकडे पावसामुळे वाहतूक काेंडीची समस्या वाढली आहे. साेमवारी पुणे शहरातील सर्वच महत्त्वाच्या भागांमध्ये माेठ्याप्रमाणावर वाहतूक काेंडी झाली हाेती. फर्ग्युसन रस्ता, कर्वे रस्ता, काेथरुड, शिवाजीनगर, बीएमसीसी रस्ता या सर्वच रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या हाेत्या. ज्ञानेश्वर पादुका चाैकामध्ये वाहतूकीचा बाेजवारा उडाला हाेता. सकाळी वाहतूक काेंडी झाल्याने चाकारमान्यांना वेळेवर कार्यालयात पाेहचता आले नाही. वाहतूक काेंडीमुळे पादचाऱ्यांना देखील रस्त्यावरुन चालणे अवघड झाले हाेते. संध्याकाळी देखील या सर्व भागात सारखीच परिस्थिती पाहायला मिळाली. 

साेमवारी शहरातील काही सिग्नल्स बंद असल्याने वाहतूक काेंडीत भर पडली. कर्वे रस्त्यावर मेट्राेचे काम सुरु असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. त्यातच वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतूक धिम्या गतीने सुरु हाेती. फर्ग्युसन रस्त्याचे नुकताच नुतनीकरण करण्यात आले आहे. पादचाऱ्यांसाठी पदपथ माेठे करण्यात आले आहेत. परंतु या नव्या रचनेमुळे वाहने लावण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे वाहनचालक कशाही पद्धतीने वाहने या रस्त्यावर लावतात. त्यामुळे वाहतूककाेंडीत वाढ हाेत असते. साेमवारी अनावधानेच पाेलीस कर्मचारी वाहतूक नियमन करताना दिसले. 

पुण्यात लाेकसंख्येपेक्षा अधिक वाहने गेल्या काही वर्षांपासून पुण्यातील वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पुण्याच्या लाेकसंख्येपेक्षा जास्त वाहनांची पुण्यात संख्या आहे. सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने नागरिकांकडून खासगी वाहनांचा वापर वाढला आहे. त्याचबराेबर गेल्या काही वर्षात शहरात चारचाकींची संख्या देखील लक्षणीय वाढली आहे. यात भर म्हणून ओला, उबेर सारख्या टॅक्सींची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहतूक काेंडीमध्ये भर पडताना दिसत आहे. येत्या काळात वाहनसंख्येवर नियंत्रण न आणल्यास परिस्थिती अधिक गंभीर हाेण्याची शक्यता तज्ञ व्यक्त करत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसRainपाऊस