शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या पावणेचार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; तडीपार असणाऱ्या नराधमाला २१ वर्षांची सक्तमजुरी

By नम्रता फडणीस | Updated: August 21, 2024 18:38 IST

नराधमाने मुलगी घरासमोर अंगणवाडीच्या मैदानात खेळत असताना तिला टेकडीवर नेत लैंगिक अत्याचार केले

पुणे: अवघ्या पावणेचार वर्षांच्या मुलीला टेकडीवर नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला २१ वर्षांची सक्तमजुरी व ७५ हजार रुपयांचा दंड लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या (पोक्सो) न्यायालयाने ठोठावला. विशेष न्यायाधीश के. पी. क्षीरसागर यांनी हा निकाल दिला. आरोपी हा तडीपार असतानाही  शहरात येऊन त्याने हे वाईट कृत्य केले.       उच्चाप्पा लिंगाप्पा मंगळूर (वय ३०, रा. चिंचवड) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात पीडित मुलीच्या वडिलांनी चिंचवड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. ही घटना २ ऑक्टोबर २०१८ रोजी बिजलीनगर येथील टेकडीवर घडली. आरोपी उच्चाप्पाला तत्कालीन पुणे शहर आयुक्तालय व पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार करण्यात आले होते. मात्र, तो तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून शहरात आला. पीडित मुलगी ही घरासमोर अंगणवाडीच्या मैदानात खेळत असताना आरोपीने तिला टेकडीवर नेत लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले.        या खटल्यात विशेष सरकारी वकील नितीन कोंघे यांनी सरकार पक्षातर्फे दहा साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडित मुलीसह प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीने त्याची वासना शमविण्यासाठी हा घृणास्पद गुन्हा केला आहे. त्यामुळे पीडितेला शारीरिक व मानसिक धक्का बसला आहे. आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता कोणतीही दयामाया न दाखविता त्याला कठोर शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केला. सरकार पक्ष व बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने आरोपीला कठोर शिक्षा सुनावली, तसेच पीडितेला भरपाई देण्याचे आदेश पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला दिले. चिंचवड ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र कोळी, हवालदार दिनेश बांबळे यांनी न्यायालयाच्या कामकाजात मदत केली. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयWomenमहिलाMolestationविनयभंग