शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम देण्याच्या बहाण्याने पुण्यात महिलेवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 14:55 IST

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर निकम हा युट्युबवर शॉर्ट फिल्म बनवितो. त्याने काही गाणीही बनविली आहेत. या शॉर्ट फिल्ममध्ये काम देण्याच्या बहाण्याने त्याने फिर्यादी यांच्याशी ओळख वाढविला...

पुणे : फिल्म इंडस्ट्रीमध्ये शॉर्ट फिल्ममध्ये काम देतो, असे आमिष दाखवून एका महिलेला आपल्या वासनाची शिकार करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढव्यातील एका ३१ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी समीर बाळू निकम (वय ३२, रा. जिजाऊ बिल्डींग, नर्हेगाव) याला अटक केली आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०१७ पासून १६ ऑक्टोबर २०२१ पर्यंत फिर्यादी व आरोपीच्या घरी सुरु होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर निकम हा यु ट्युबवर शॉर्ट फिल्म बनवितो. त्याने काही गाणीही बनविली आहेत. या शॉर्ट फिल्ममध्ये काम देण्याच्या बहाण्याने त्याने फिर्यादी यांच्याशी ओळख वाढविला. युट्युबवर बनविलेल्या शॉर्ट फिल्मची गाणी त्यांना दाखवून त्यात काम मिळवून देण्याचा बहाणा करुन त्यांच्याशी शारीरीक जवळीक साधली. त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांना मारहाण करुन वारंवार जबरदस्तीने बलात्कार केला. या त्रासाला कंटाळून त्यांनी शेवटी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे.पोलीस उपनिरीक्षक खेतमाळस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMolestationविनयभंगKondhvaकोंढवाCrime Newsगुन्हेगारीpimpri-acपिंपरी