Pune News: सोशल मीडियावरील ओळख वाढवून तरुणीवर बलात्कार, गुन्हा दाखल
By नितीश गोवंडे | Updated: January 1, 2024 13:49 IST2024-01-01T13:47:18+5:302024-01-01T13:49:21+5:30
भारती विद्यापीठ पोलिसांनी समित उमेश सोनवणे (३१) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे....

Pune News: सोशल मीडियावरील ओळख वाढवून तरुणीवर बलात्कार, गुन्हा दाखल
पुणे : सोशल मीडियावर ओळख वाढवली. त्यानंतर तरुणीला विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका ३२ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. दरम्यान हा प्रकार ऑक्टोबर २०२१ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत कात्रज आणि गोवा येथे घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी समित उमेश सोनवणे (३१) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, समित आणि पीडित तरुणीची ओळख सोशल मीडियावर झाली. चॅटिंग करत असताना त्यांचे सूत जुळले. आरोपीने त्याचे पहिले लग्न झाल्याचे लपवून ठेवत तरुणीला अविवाहित असल्याचे सांगितले. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर कात्रज येथील एका लॉजमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच गोवा येथे फिरण्यास नेऊन तिच्यावर अत्याचार केले. तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता समित याने लग्न करण्यास टाळाटाळ करुन अद्यापर्यंत लग्न केले नाही. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.