शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'जे डब्ल्यु मेरियट' हॉटेलच्या बाऊन्सर विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 15:16 IST

पंचतारांकित हॉटेलमधील मायामी डान्सिंग क्लबमध्ये दोघा बाऊन्सरने तरुणीशी लज्जास्पद वर्तन

ठळक मुद्देयाप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी दोघा बाऊन्सरवर विनयभंगासह मारहाणीचा गुन्हा दाखल

पुणे : जे डब्ल्यु मेरियट या पंचतारांकित हॉटेलमधील मायामी डान्सिंग क्लबमध्ये बाकावर आराम करीत असताना दोघा बाऊन्सरने तरुणीशी लज्जास्पद वर्तन करुन तिच्या बॉयफ्रेंडला शिवीगाळ करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी दोघा बाऊन्सरवर विनयभंगासह मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटना पहाटे २६ जानेवारी रोजी पहाटे २ वाजता घडली आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या आर्शिवादाने पंचतारांकित हॉटेलमधील पब, डॉन्स क्लबमध्ये रात्रभर धिंगाणा सुरु असल्याचा जो आरोप नागरिकांकडून केला जातो, तो खरा असल्याचे आढळून आले आहे.गुन्हे शाखेच्या वतीने ३१ डिसेंबरपूर्वी मोठ्या प्रमाणावर शहरात सर्च आॅपरेशन राबविले. त्यात उशीरापर्यंंत सुरु असलेल्या पंचतारांकित हॉटेल, पब, डॉन्सिंग क्लब यांच्यावर कारवाई केली होती. या पबवरही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही दिलेल्या वेळेनंतरही हा मायामी डान्सिंग क्लब सुरु असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी २२ वर्षाच्या तरुणीने चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही तरुणी बालेवाडी येथील एका गर्ल्स होस्टेलमध्ये राहते. ही तरुणी आपल्या एका मित्राबरोबर २५ जानेवारी रोजी जे डब्ल्यु मेरियट या हॉटेलमधील मायामी डान्सिंग क्लबमध्ये गेली़ मित्राबरोबर पार्टी करीत असताना पहाटे २ वाजता तिला पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे तेथील लाकडी बेंचवर ती आराम करीत होती. त्यावेळी क्लमधील दोन अनोळखी बाऊंन्सर तेथे आले व तिच्या दंडाला धरुन उठविले़ तसेच तिच्या अंगावर नको तेथे हात लावून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. त्याला तिच्या मित्राने विरोध केल्यावर त्याला या बाऊन्सरनी शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. या घटनेनंतर त्यांनी सोमवारी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

टॅग्स :PuneपुणेhotelहॉटेलMolestationविनयभंगWomenमहिलाPoliceपोलिस