मोहन जोशी यांच्याकडे ४ कोटींची संपत्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 00:01 IST2019-04-04T00:01:09+5:302019-04-04T00:01:25+5:30
मोहन जोशी यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी स्वच्या व पत्नीच्या नावावर कर्ज असल्याचे दाखविले आहे.

मोहन जोशी यांच्याकडे ४ कोटींची संपत्ती
पुणे : पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार मोहन जोशी यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला असून अर्जा सोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात कुटुंबाकडे ४ कोटी ७७ लाख २४ हजार ५५९ रुपयांची संपत्ती असल्याची माहिती सादर केली आहे.
मोहन जोशी यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी स्वच्या व पत्नीच्या नावावर कर्ज असल्याचे दाखविले आहे. जोशी यांच्याकडे १ लाख ७२ हजार ३८० रुपये रोख असून पत्नी निर्मला यांच्याकडे १ लाख ४४ हजार ११० रुपये असल्याचे नमूद केले आहे.त्याच प्रमाणे जोशी यांच्या बँक खातामध्ये ८ लाख ८५ हजार ५८५ आणि पत्नीच्या खात्यात २ लाख ६६ हजार ७२७ रुपये असल्याचे स्पष्ट केले आहे.
मोहन जोशी यांनी रोहित जोशी यांच्याकडून २८ लाख १२ हजार ८७९ रुपये तर पत्नीने आशिष नागपाल यांच्याकडून १० लाख रुपये घेतले आहेत. मुळशी तालुक्यात मुळशी खुर्द येथे जोशी यांची ५ एकर जमीन आहे. शुक्रवार पेठ येथे ४७७ चौरस फूटांची सदनिका, अंधेरी येथे ६९४ चौरस फूटांची सदनिका आहे. सोपान बाग येथे ४हजार ४०० चौरस फूटांची सदनिका असल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे.
मोहन जोशी
४शिक्षण................ दहावी
४वय.................... 63
४दाखल गुन्हे........... तीन
मालमत्ता मोहन जोशी निर्मला जोशी (पत्नी ) अवलंबित्व १
जंगम ६७,४७,९१५ २६,७२,७८७ नाही
स्थावर ४९,६१,२६९ ३,४०,४२,५८८ नाही
कर्ज ४०,५८,२६६ ३,११,५४,२५७ नाही