शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शक्तिप्रदर्शन करून मोहन जोशी व सुप्रिया सुळे यांनी भरला अर्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 19:28 IST

पुणे व बारामतीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससह मित्र पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने यावेळी हजेरी लावली. 

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील मोहन जोशी व बारामती लोकसभा मतदारसंघातील सुप्रिया सुळे यांनी शक्तीप्रदर्शन करून बुधवारी (दि. ३) उमेदवारी अर्ज दाखल केले. पुणे व बारामतीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससह मित्र पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने यावेळी हजेरी लावली. दोन्ही उमेदवारांचे अर्ज भरण्यापुर्वी सकाळी नरपतगिरी चौकामध्ये सभा घेण्यात आली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार वंदना चव्हाण, महाराष्ट्राच्या सहप्रभारी सोनल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे, डॉ. विश्वजित कदम, संग्राम थोपटे, माजी आमदार उल्हास पवार, कुमार सप्तर्षी, चेतन तुपे, रमेश बागवे, प्रदीप गारटकर यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सुळे या सभेच्या ठिकाणी पती सदानंद, मुलगी रेवती आणि मावळ लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार यांच्यासोबत आल्या होत्या. सभेनंतर रॅली काढून दोघे उमेदवार अर्ज भरण्यासाठी जातील, असे अपेक्षित होते. पण उन्हाचा तडाखा, गर्दी आणि वाहतुक कोंडीमुळे सभा सुरू असतानाच सुळे यांच्यासोबत हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील, थोपटे, जगताप अर्ज भरण्यासाठी गेले. त्यानंतर तासाभराने पृथ्वीराज चव्हाण, वंदना चव्हाण, पटेल, कदम, गायकवाड यांच्यासोबत जाऊन जोशी यांनी अर्ज भरला. सभेमध्ये सर्वच नेत्यांनी मोदी सरकार व राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. चव्हाण म्हणाले, विरोधक व्यक्तीकेंद्रीत राजकारण करू पाहत आहेत. या ह्यट्रॅपह्णमध्ये न अडकता त्यांना मुळे मुद्यावर खेचून आणावे. त्यांना उत्तर देण्याच्या भानगडीत पडू नये. त्यांना जाहीरनामाही आणता येणार नाही. मागच्या जाहीरनाम्याचे काय झाले हे त्यांना सांगावे लागेल.कालपर्यंत आपण एकमेकांविरोधात लढलो असेल. पण आता सगळे विसरा, असे पवारांनाही सांगितले आहे. आता वेळ वेगळी असून एकत्र येणे ही काळाची गरज आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.------------अमोल कोल्हे ९ तारखेला अर्ज भरणारशिरूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार डॉ. अमोल कोल्हे मंगळवारी (दि. ९) अर्ज भरणार आहेत. तर पार्थ पवारही ८ किंवा ९ तारखेला अर्ज भरणार आहेत. त्यादिवशीही नरपतगिरी चौकात सभा घेऊन शक्तिप्रदर्शन केले जाणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.------------

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकpune-pcपुणे