शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

मोहन भागवत, एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी घेतले मदन दास देवींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 10:35 IST

मदन दास देवी यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत संघाच्या मोतीबाग या कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहसरकार्यवाह मदन दास देवी यांच्या पार्थिवावर आज, मंगळवारी सकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संघाचे विद्यमान सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यावेळी उपस्थित असतील. मदन दास देवी (८१) यांचे सोमवारी (दि. २४) पहाटे बंगळुरू येथे निधन झाले. मदन दास देवी यांचे नातेवाईक पुण्यात असून, निवृत्तीनंतर देवी यांचे वास्तव्य पुण्यातच होते. आजारपणामुळे निसर्गोपचारासाठी त्यांना बेंगळुरू येथे हलविण्यात आले होते. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे माजी सह-सरकार्यवाह मदनदासजी देवी यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक डॅा. मोहन भागवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी घेतले. यावेळी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे स्वयंसेवक सह भाजप पक्षातील पदाधिकारी इतर  मान्यवर मोठ्या संख्येनेउपस्थित होते. यावेळी मोतीबाग येथे पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

अल्पपरिचय

मदन दास देवी हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत संघ योजनेतून देण्यात आलेले पहिले प्रचारक होते. अनेक वर्षे त्यांनी परिषदेची संघटनमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा हे त्यांचे मूळ गाव. शालेय शिक्षणानंतर उच्चशिक्षणासाठी पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयात त्यांनी १९५९ मध्ये प्रवेश घेतला. एम.कॉम. नंतर आयएलएस लॉ कॉलेजमध्ये सुवर्णपदकासह एलएलबीची परीक्षा उत्तीर्ण केली. राष्ट्रीय स्तरावर रँक मिळवून ते सनदी लेखापाल परीक्षा उत्तीर्ण झाले. पुण्यात शिक्षण घेत असतानाच मोठे बंधू खुशाल दास देवी यांच्या प्रेरणेने त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला. त्यानंतर त्यांनी आपले आयुष्य राष्ट्रसेवा आणि संघकार्यासाठी वाहून घेतले. जवळपास ७० वर्षे त्यांनी संघाच्या प्रचारासाठी काम केले. दैनंदिन शाखेतील स्वयंसेवकापासून सहसरकार्यवाह असा त्यांचा प्रवास झाला. मदन दास देवी यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत संघाच्या मोतीबाग या कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर ११.३० वाजता अंत्यसंस्कार होतील.

टॅग्स :PuneपुणेMohan Bhagwatमोहन भागवतEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस