शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचा विजय हा सावरकरांच्या विचारांचा विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 13:08 IST

‘राष्ट्रहित हीच सावरकरांच्या तत्वांची भूमिका होती.त्यांच्या राष्ट्रहिताच्या नीतीला आज न्याय मिळाला आहे.

ठळक मुद्देअक्षय जोग लिखित पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : सावरकरांच्या राष्ट्रहिताच्या नीतीला आज न्याय मिळाला आहे. त्यांच्या भूमिकेला कोंदण लाभले आहे. बुद्धिप्राण्यावर आधारित विज्ञाननिष्ठा ही सावरकरांची आपल्याला मिळालेली देणगी आहे. त्यांची मूल्ये सत्तेच्या रुपात सत्यात उतरली आहेत. नरेंद्र मोदींचा विजय हा सावरकरांच्या विचारांचा विजय आहे, असे मत माजी खासदार प्रदीप रावत यांनी व्यक्त केले. निवडणुकीतील पराभव कोणत्याही पक्षाचा नसून, राष्ट्रीय ऐक्याला बाधा निर्माण करणा-या राजकारणाचा पराभव आहे, असेही त्यांनी नमूद केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त ‘स्वातंत्र्यवीर सावरकर आक्षेप आणि वास्तव’ या अक्षय जोग लिखित पुस्तकाचे प्रकाशन रावत यांच्या हस्ते रविवारी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक आणि अध्यासन येथे पार पडले. यावेळी लेखक अक्षय जोग, मृत्यूंजय प्रकाशनाचे सात्यकी सावकर उपस्थित होते. याप्रसंगी रत्नागिरीमध्ये पतित पावन मंदिर उभारणा-या भागोजीसेठ कीर यांचे वंशज विवेक कीर आणि ‘त्या तिघी-स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात समिधा’ या एकपात्री नाट्यप्रयोगाच्या सादरकर्त्या अपर्णा चोथे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.रावत म्हणाले, ‘सावरकरांनी द्विराष्ट्रवादाची वस्तूस्थिती मांडली. त्यांची सामाजिक, धार्मिक मूल्ये, वैचारिक पाया, बुध्दीवादाचा वैज्ञानिक दृष्टिकोन असा अखंड धागा समजून घेणे आवश्यक आहे.  हिंदुत्व हे राजकारणाचे मध्यवर्ती सूत्र बनले आहे. सावरकरांविरोधात गरळ ओकणाऱ्या, नालस्ती करणाऱ्या सुपारी गँगला वैचारिक बैठक नाही. धर्मनिरपेक्षतेच्या, पुरोगामित्वाच्या नावाखाली मुल्यांना काळिमा फासणारे राजकारण केले गेले.’ ‘राष्ट्रहित हीच सावरकरांच्या तत्वांची भूमिका होती. कोणतेच राष्ट्रहित हिंदूविरोधी असू शकत नाही. समानता हाच हिंदुत्वाचा मूळ धागा आहे. सावरकरांचा विचार खालच्या स्तरापर्यंत तर बाबासाहेबांचा विचार वरच्या स्तरापर्यंत पोहचला पाहिजे. महापुरुषांची साम्यस्थळे, वेगळेपणाची मांडणी यांचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. समाजाने एकत्र यायचे असेल तर फुटीरतावादी शक्तींना दूर ठेवता आले पाहिजे’, असेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :PuneपुणेVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरNarendra Modiनरेंद्र मोदीHindutvaहिंदुत्वLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल