शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाकडून मिहीर कोटेचांच्या कार्यालयाची तोडफोड; मुंबईत जोरदार राडा
2
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
3
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
4
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
5
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
6
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
7
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
8
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
9
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
10
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
11
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
12
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
13
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
14
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
15
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
16
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
17
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
18
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
19
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
20
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान

मोदीजी..तुम्ही कठोर निर्णय घ्या..सैन्याला लागणारी मदत गोळा करण्यास आम्ही सुरुवात केलीय..

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 4:26 PM

पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाले तसेच असंख्य जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देगणेश बोरा यांनी या जवानांच्या कुटुंबियांसाठी आणि राष्ट्रीय सुरक्षा मदत निधी उभारण्याचे काम केले सुरु

पिंपरी (रावेत) : पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाले तसेच असंख्य जखमी झाले आहेत. ही घटना वाचून,ऐकून आणि पाहून हृदय पिळवटणार नाही असा एकही माणूस भारतात सापडणार नाही. या संकटानंतर देशभर सर्वत्र सहानुभूतीची आणि दु:खाची लाट पसरली. शहीद झालेल्या सर्व जवानांना देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. पण भारत देशाचे नागरिक म्हणून आपली एवढीच जबाबदारी आहे का? मनातील खदखद कुठेतरी व्यक्त झाली म्हणजे आपले कर्तव्य संपणार आहे का ? या प्रश्नांची उत्तर सोशल मीडियावरील तरुणांनी शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून एक भारतीय नागरिक म्हणून राष्ट्रीय सुरक्षा निधीसाठी आर्थिक मदत करण्याचे अनोखे कार्य उभे राहिले. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे गणेश बोरा यांनी या जवानांच्या कुटुंबियांसाठी आणि राष्ट्रीय सुरक्षा मदत निधी उभारण्याचे काम हाती घेतले . या कार्यात प्रत्येक देशभक्त आणि सामाजिक भान जागृत असणाऱ्या भारतीयाने आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे असे आवाहन गणेश बोरा यांनी  केले होते. काल राष्ट्रीय सुरक्षा निधीसाठी स्वत: पासून त्यांनी सुरवात करत ५०० रुपये निधी दिला आणि सोशल मीडियामधुन आवाहन केले होते की सर्वांनी निधी दयावा ज्यामुळे  पंतप्रधानांना पाकिस्तान आणि दहशतवाद विरोधी युद्धात निधी कमी पडण्याची चिंता वाटणार नाही आणि ते कठोर पाऊले उचलण्यास मागे हटणार नाहीत या आव्हानाला कालपासून असख्य नेटिझनसनी मोठया प्रमाणात प्रतिसाद देत आपल्या आपल्या परीने मदत करण्यास सुरुवात केली आहे. कुणाचे प्राण वाचवण्यासाठी प्राण त्यागणे याच्या इतका निस्सीम त्याग अन्य कोणत्याही गोष्टीत नाही. म्हणूनच असा त्याग करणार-या भारतीय जवानांच्या कुटुंबियांना आणि युद्ध जन्य परिस्थिती निर्माण झाली तर देशाला निधी कमी पडू नये या करिता आपापल्या परीने मदत करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. या भावनेतून सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे गणेश बोरा यांनी या जवानांच्या कुटुंबियांसाठी आणि राष्ट्रीय सुरक्षा मदत निधी उभारण्याचे काम हाती घेतले ल्लाि. ndf. gov.in या वेबसाईटवर जाऊन आपण आॅनलाईन पैसे देऊ शकतो शिवाय दिलेल्या निधीला आयकरात सवलत मिळते. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडravetरावेतIndian Armyभारतीय जवानNarendra Modiनरेंद्र मोदीSocial Mediaसोशल मीडियाpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला