शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

"मोदी-शाह होश में आओ, होश में आओ.."; पुण्यात शेतकरी संघटना आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 15:19 IST

आंदोलक आक्रमक होत वाहनांच्या समोर झोपल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण

पुणे : मोदी-शाह होश में आओ.. होश में आओ, कामगार आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध असो, वापस लो..वापस लो काला कानून वापस लो, केंद्र सरकार हाय हाय, रद्द करा रद्द करा काळे कृषी कायदे रद्द करा,यासारख्या घोषणांद्वारे दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ व केंद्र सरकारच्या निषेधार्थ बाणेर व वारजे येथे शेतकरी संघटनांसह विविध राजकीय पक्षांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र, आंदोलनामुळे मुंबई- बेंगलोर महामार्गावर काहीवेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. 

पुण्यात शनिवारी वारजे आणि बाणेर याठिकाणी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ चक्का जाम आंदोलन करण्यात आले.  रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्यामुळे बाणेर परिसरामध्ये काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यावेळी शेतकरी आंदोलकांनी बालेवाडी फाटा परिसरामध्ये या आंदोलन करत रस्ता रोखून धरला होता. शेतकरी आंदोलनात त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. परंतु आंदोलक आक्रमक होत वाहनांच्या समोर झोपल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर म्हणाले, केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांची फोन ची वाट न बघता हे काळे तीन कायदे मागे घ्यावेत. गेले अडीच महिने शेतकरी आंदोलन करीत आहेत देशातील शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवण्याचा घाट केंद्र सरकार रचत आहे. देशातील शेतकऱ्यांच्या एक जुटी पुढे मोदी सरकारला हे तीन शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावे लागतील.

शेतकरी आंदोलच्या समर्थनार्थ वारजेतही चक्का जाम वारजे : शेतकरी संघटनांच्या दिल्लीतून आलेल्या चक्काजाम आंदोलनाच्या हाकेला प्रतिसाद देत वारजे उड्डाणपूल चौकात सर्वपक्षीय चक्का जाम आंदोलन करण्यात आले. वापस लो वापस लो, काला कानून वापस लो, म्हणत सकाळी अकराच्या सुमारास मोठ्या संख्येने आंदोलकांनी घोषणा देत काही काळ मुंबई-बंगळुरू महामार्ग सेवा रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी योग्य नियोजन केल्याने वाहतुकीस फारसा अडथळा झाला नाही. केंद्राच्या निषेधार्थ भाषणे झाल्यावर सुमारे दीड तास चाललेले आंदोलन सहायक पोलिस आयुक्तांनी अखेर हस्तक्षेप करत आटोपते घ्यायला लावले.  यावेळी दत्ता पाखिरे,जावेद शेख, सचिन बराटे, दत्ता झंजे, पैगंबर शेख यांना पोलिसांनी ताब्यात घेत प्रतिबंधक कारवाईसाठी वारजे पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेFarmer strikeशेतकरी संपPoliceपोलिसSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाPoliticsराजकारणCentral Governmentकेंद्र सरकार