शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

गुंड रोशन लोखंडे व साथीदारांना पोलिसांचा दणका; मोक्का अंतर्गत केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 18:56 IST

नऱ्हेगावात कोयता, पिस्तूल नाचवत केली होती दहशत...

ठळक मुद्देसंघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी कसली कंबर

धायरी: संघटित टोळी तयार करून त्यांच्यामार्फत गुन्हेगारी कृत्य करून दहशत निर्माण करणाऱ्या गुंड रोशन लोखंडे व त्याच्या टोळीतील चार जणांवर पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. 

 रोशन दयानंद लोखंडे (वय: २१, रा. नवदीप सोसायटी, मानाजी नगर, नऱ्हे, पुणे) प्रसाद अर्जुन धावडे (वय:२०, रा. विठ्ठल रुक्मिणी हाईट्स, जाधव नगर, नांदेडगाव, पुणे) वैभव अरुण तिडके (वय:२१, रा. कृष्ण सदन बिल्डींग, मानाजीनगर, नऱ्हे, पुणे) पवन सुग्रीव बिराजदार वय:२४, रा. दत्तकला अपार्टमेंट,नऱ्हे, पुणे) फैजल फिरोज काझी (वय:२१, ऋतुंबरा हाईट्स, राम मंदिराजवळ पिराजी नगर, नऱ्हे, पुणे) अशी पाच आरोपींची नावे आहेत.  

सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथील पिराजी नगर परिसरात शिवजयंती दिवशी तडीपार गुंड रोशन लोखंडे व त्याच्या साथीदारांनी हातात कोयता व पिस्तूल घेऊन नाचत दहशत निर्माण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याबाबत सिंहगड रस्ता पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेत आरोपींना तात्काळ अटक केली. नागरिकांत दहशत माजविल्याप्रकरणी तसेच नऱ्हे येथील भूमकर पुलाखाली एका व्यक्तीला कोयत्याचा धाक दाखवून लुटले.

त्याचबरोबर १५ फेब्रुवारी रोजी एका बांधकाम व्यावसायिकाच्या ऑफिसमध्ये जाऊन लोखंडी कोयते,चाकू,हॉकी स्टिक अशी हत्यारे बरोबर घेऊन त्याचा धाक दाखवून खंडणी मागत १० हजार रुपये घेतले. यामध्ये सामील असणाऱ्या आरोपींचा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा अभ्यास करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे सिंहगड रस्ता पोलिसांनी सांगितले.

पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर आत्तापर्यंत २१ टोळ्यांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.संघटित गुन्हेगारीचे जाळे उखडून टाकण्यासाठी राज्य सरकारने तयार केलेला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) पुणे पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाईचा धडाकाच सुरु केला आहे. अनेक टोळ्यांवर प्रभावीपणे ‘मोक्का’ लावल्यामुळे पुण्यातील संघटित गुन्हेगारीचे कंबरडे मोडले आहे.......दोनवेळा तडीपार अन गुन्ह्यांची मालिका..  गुंड रोशन लोखंडे व त्याच्या साथीदारावर २०१६ सालापासून पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. रोशन लोखंडे व त्याच्या टोळीविरुद्ध शस्त्र जवळ बाळगणे, बेकायदा शस्त्र बाळगणे,अग्निशस्त्र बाळगणे, जबरी चोरी करणे आदी प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. याआधी रोशन लोखंडे याला दोनवेळा तडीपार करण्यात आले होते.सुरूच, मात्र तरीही गुन्ह्यांची मालिका सुरूच होती.........

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार तसेच संघटित टोळी तयार करून त्याचबरोबर गुन्हेगारी कृत्य करून दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्द कडक कारवाई करण्यात येत आहे.

- देविदास घेवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक , सिंहगड रस्ता पोलीस ठाणे

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस