शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पुणे स्टेशन परिसरात प्रवाशांना लुटणार्‍या ९ चोरट्यांवर मोक्का कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 22:29 IST

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशाने गेल्या वर्षभरात ४१ टोळ्यांविरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

पुणे : पुणे स्टेशन परिसरात प्रवाशांना लुटणार्‍या चोरट्यांच्या टोळीविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.

टोळीप्रमुख अल्ताफ ऊर्फ बचक्या इक्बाल पठाण, सागर ऊर्फ पार्थ ज्ञानेश्वर भांडे, मोहरम शफी शेख, शहाबाज शरीफ नदाफ, राजेश मंगल मंडल, इमाम जलालउद्दीन सय्यद, महादेव गौतम थोरा, अलिशान रफीक शेख, जय विलास तुपे अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. पुणे स्टेशन परिसरातून रिक्षामध्ये बसवून थोड्या अंतरावर गेल्यावर इतर आरोपींना रिक्षात बसवून प्रवाशांना मारहाण करुन, त्यांच्यावर चाकूने वार करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्यांच्याकडील रोख रक्कम, मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेत असत़ या ९ जणांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडे केलेल्या तपासात टोळी प्रमुख अल्ताफ पठाण याने इतरांच्या मदतीने हे गुन्हे केल्याचे आढळून आले.

बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी या टोळीविरुद्ध मोक्का प्रस्ताव तयार करुन पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्यामार्फत अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्याकडे पाठविला. डॉ. शिंदे यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन त्यास मंजुरी दिली. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशाने गेल्या वर्षभरात ४१ टोळ्यांविरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसcommissionerआयुक्त