पुणे स्टेशन आणि कोरेगाव परिसरात मोबाइल चोरणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:09 IST2021-05-15T04:09:01+5:302021-05-15T04:09:01+5:30
पुणे : पुणे स्टेशन आणि कोरेगाव परिसरात मोबाइल चोरी करणारा गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या जाळ्यात सापडला. पोलीस आयुक्त ...

पुणे स्टेशन आणि कोरेगाव परिसरात मोबाइल चोरणारा अटकेत
पुणे : पुणे स्टेशन आणि कोरेगाव परिसरात मोबाइल चोरी करणारा गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या जाळ्यात सापडला. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार शहरातील अवैध धंदे, बेकायदेशीर कृत्य करणारे गुन्हेगार तसेच शरीर व मालमत्तेविरूद्ध गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून गुन्हे आणि गुन्हेगारांचे समूळ उच्चाटन करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यानुसार गुन्हेगारांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.
प्रभाकर रमेश सिंग (वय २१, रा. ताडीवाला रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युनिट २ चे पथक कोरेगाव पार्कच्या हद्दीमध्ये गस्त घालत असताना पोलीस अंमलदार समीर पाटील आणि चेतन गोरे यांना माहिती मिळाली की, बोट क्लब रस्त्यावर एक मोबाइल चोर काळ्या रंगाच्या दुचाकीवर थांबला आहे. पथकाच्या मदतीने त्याला ताब्यात घेऊन विचारणा केली आणि दुचाकीच्या डिक्कीची तपासणी केली. तेव्हा त्याच्याकडे ५ मोबाइल फोन आढळून आले. त्याने बंडगार्डन, कोरेगाव पार्क, मार्केटयार्ड, लोणी कंद परिसरात बिना नंबर प्लेटच्या गाडीचा वापर करून मोबाइल चोरी केल्याची कबुली दिली. गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे, सहायक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले, पोलीस अंमलदार यशवंत आंब्रे, अस्लम पठाण, चेतन गोरे, निखिल जाधव, समीर पटेल, गोपाळ मदने, गजानन सोनुने, अजित फरांदे, कादीर शेख, उत्तम तारू, मितेश चोरमोले, अरूणा शिंदे यांनी ही कामगिरी केली.