शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
2
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
3
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
4
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
5
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
6
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
7
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
8
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
9
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
10
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
11
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
12
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
13
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
14
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
15
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
16
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
17
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
18
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
19
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
20
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!

कलचाचणीत अडकली मोबाईल की संगणक वादात ; विद्यार्थी-पालक संभ्रमात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 15:00 IST

शाळांनी मोबाईल अँपवर 18 डिसेंबर 2018 ते 17 जानेवारी 2019 दरम्यान कलचाचणी घ्यावी. अशा सुचना राज्य मंडळाने दिल्या आहेत.

ठळक मुद्देकलचाचणीत विद्यार्थ्यांचे नुकसान नको गुणवत्तेपेक्षा तांत्रिक बाजू ठरताहेत कमकुवत 

- युगंधर ताजणे-  पुणे : एकीकडे ग्रामीण दुर्गम भागातील शाळा म्हणून वीज, इंटरनेटच्या पुरेशा सोयीअभावी कलचाचणी देण्यात विद्यार्थ्यांना व्यत्यय येतो आहे. दुसरीकडे शहरी शाळांकडे मुबलक प्रमाणात असलेल्या संगणकांमुळे त्यांना कलचाचणी देता येणे शक्य होते आहे. मात्र यासगळ्यात शाळांच्या मुलभूत सोयीसुविधांच्या कमतरतेकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. कलचाचणी मोबाईलवर घ्यावी की संगणकावर? या प्रश्नात विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याकडे लक्ष देणे महत्वाचे ठरणार आहे.     शाळांनी मोबाईल अँपवर 18 डिसेंबर 2018 ते 17 जानेवारी 2019 दरम्यान कलचाचणी घ्यावी. अशा सुचना राज्य मंडळाने दिल्या आहेत. या सुचनेनंतर कलचाचणी मोबाईल अँपवर घ्यावी की संगणकावर याविषयी विद्यार्थी आणि पालक संभ्रमात पडले आहेत. करिअरचे विविध पर्याय उपलब्ध असतानाही केवळ माहितीच्या अभावामुळे पालक आणि विद्यार्थी दहावी नंतर काय? याविषयी व्दिधा मनस्थितीत असतात. आणि त्यामुळे  परिस्थितीजन्य कारणांअभावी कित्येकदा आवड आणि अभिक्षमता नसणा-या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांकडून प्रवेश घेतला जातो. ज्याचा परिणाम म्हणजे भविष्यात यशस्वी होण्याच्या शक्यता कमी होतात. याकरिता प्रत्येक विद्यार्थ्यांमधील वेगळेपण ओळखता येऊन त्याला त्याची आवड असणारे क्षेत्र शोधता यावे याकरिता  कलचाचणी प्रकल्प सुरु करण्यात आला. मात्र गेल्या काही दिवसांपासून ही कलचाचणी घेण्याकरिता तांत्रिक अडचणी येण्यास सुरुवात झाली असून तिचे स्वरुप ह्णह्णमोबाईल की संगणक असे झाले आहे. याविषयी अधिक माहिती देताना सरस्वती मंदिर संस्थेचे प्राचार्य अविनाश ताकवले म्हणाले, नवीन अभ्यासक्रमानुसार यंदा पहिलीच दहावीची परीक्षा आहे. त्या परीक्षेचा अंदाज येणे कठीण आहे. अभ्यासातील बद्लानुसार विद्यार्थी घडावा. असा त्यामागील उद्देश होता. आता खडु,फ ळा, डस्टर ही संकल्पना मागे पडली असून शालेय स्तरावर डिजिटीलायझेशन पुढे येत आहे. कलचाचणीकरिता मोबाईल फोनसाठी वापरण्यात येत आहे. मात्र मोबाईलचा वापर करत असताना शिक्षकांबरोबर पालकांचा सहभाग आवश्यक आहे. ........................* सधन पालकांना आपल्या पाल्याला मोबाईल घेऊन देणे शक्य आहे. याऊलट गरीब पालकांनी काय करायचे हा प्रश्न आहे. मुळातच सातत्याने शिक्षणाविषयी तयार होत जाणा-या उदासीनतेने पालक त्रस्त झाले आहेत. शासनाने शैक्षणिक टँब उपलब्ध करुन द्यावेत. तसे झाल्यास संकल्पना साध्य होईल. याबरोबरच विविध सामाजिक, सेवाभावी संस्था, दानशूर लोकांनी आर्थिक सहकार्य मिळाल्यास मोबाईल की कॉम्प्युटर हा वाद राहणार नसल्याचे ताकवले यांनी सांगितले. ................* संगणकापेक्षा मोबाईल हा अधिक सोयीस्कर आहे. कारण मुले मोबाईलशी अधिक  ह्यह्यफ्रेंडलीह्णह्ण आहेत. कलचाचणी कुठल्याही साधनाच्या माध्यमातून दिल्यास त्यातून लागणारा वेळ सारखाच आहे. मोबाईल सर्वांना परवडण्यासारखा आहे. शाळा, त्यात उपलब्ध असलेल्या संगणकांची संख्या पाहिल्यास विद्यार्थ्यांना कलचाचणीसाठी संगणक मिळणे अशक्य गोष्ट आहे. मोबाईलवर कलचाचणी घेण्याचा फायदा असा की, त्या महाकरिअर अँपचे विद्यार्थी व पालक यांच्याकरिता जे व्हिडिओ अपलोड केले जातात ते विद्यार्थ्यांना मोबाईलवर बघणे सहजशक्य आहे.  काही महत्वाच्या पीडीएफ देखील मोबाईलवर वाचता येतील. तसेच एखाद्या विशिष्ट अभ्यासक्रमात जर करिअर करायचे असेल तर त्याची माहिती मोबाईलच्या माध्यमातून घरबसल्या मिळणार असल्याने मोबाईलचे महत्व नाकारता येणार नाही. - महेंद्र गणपूले ( प्रवक्ता पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ) ......................* टोलवा टोलवीत मुलांच्या आयुष्याशी खेळ नकोशासनाने एक काहीतरी प्रभावी तोडगा काढावा. आपल्याकडे दरवेळी सोयीस्कररीत्या सगळे उपक्रम राबविले जातात. कलचाचणी संगणकावर घ्यायची तर पुरेसे संगणक आहेत का? असतील तर ते चालण्याकरिता वीजेची सोय आहे का? इंटरनेट सुविधा तितकी अद्यावत आहे का? यासगळ्या प्रश्नांचा विचार शासनाने करणे गरजेचे आहे. मोबाईलच्या बाबतीत अनेक समस्या आहेत. मात्र संगणकाच्या तुलनेने त्या तितक्या गंभीर नाहीत. - एक पालक ..................* कलचाचणी संबंधी महत्वाची आकडेवारी 

- आतापर्यंत 7 लाख 10 हजार 868 विद्यार्थ्यांनी दिली कलचाचणी 

- त्यापैकी  4 लाख 34 हजार 026 जणांनी मोबाईलवरुन चाचणी देण्यास दिले प्राधान्य 

- 17 हजार 557 नोंदणीकृत शाळांमधून देण्यात आली चाचणी 

*  विभागनिहाय आकडेवारी (26 डिसेंबर पर्यंत)  या कलचाचणीत संगणकावरुन देण्यात आलेल्या चाचणीचे प्रमाण अत्यल्प आहे. अनेकांनी संगणकाऐवजी मोबाईलला प्राधान्य दिले आहे. 

विभाग       आकडेवारी 

 पुणे -     1,34,156

 नागपूर-    75,501

औरंगाबाद - 89,709

मुंबई -       1,09,629 

 कोल्हापूर-   54,317

अमरावती-   78,506

नाशिक -     1,02,206

लातूर-       52,408

कोकण -    14,436

एकूण -     7,10,868 

टॅग्स :PuneपुणेMobileमोबाइलStudentविद्यार्थीSchoolशाळाexamपरीक्षा