शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
2
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
3
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
4
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
5
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
6
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
7
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
8
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
9
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
10
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
11
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
12
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
13
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
14
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
15
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
16
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
17
"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
18
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
19
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
20
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

दारुसाठी पाचशे रूपयांत विकले मोबाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 21:44 IST

प्रवास करून रेल्वेस्टेशन, एस टी बसस्थानकात उतरल्यानंतर बाहेर गेल्यावर प्रवाशी नातेवाईकांना कॉल करण्यासाठी मोबाईल बाहेर काढतात. या संधीचा गैरफायदा घेत दोघांनी मोबाईल हिसकावून नेले.

ठळक मुद्देप्रवाशांचे मोबाईल हिसकावणारे दोघे जेरबंद  ८ गुन्हे उघडकीस : अँटी गुंडा स्कॉडची कामगिरी

पुणे : पुणे रेल्वे स्टेशन आणि स्वारगेट बसस्थानक परिसरात प्रवाशांचे मोबाईल हिसकाविणाऱ्या दोघांना अँटी गुंडा स्कॉड दक्षिण विभागाच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून ८ मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.     रोहित राजू पवार (वय १९, रा. भवानी पेठ, गवळीवाडा, कॅम्प) आणि राजु अनिल जाधव (वय २०, रा. भवानी पेठ, एडी कॅम्प चौक) असे अटक केलेल्या दोघांची नावे  आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी आठ गुन्हे उघडकिस आणले आहेत.    याबाबत पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, पोलीस निरीक्षक राम राजमाने यांनी माहिती दिली़  पुणे रेल्वे स्टेशन, स्वारगेट तसेच शिवाजीनगर परिसरात बाहेर गावाहून प्रवास करून आलेल्या प्रवासी बसची वाट पाहात असताना त्यांना लुटण्याच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे़ या पार्श्वभूमीवर अ‍ॅन्टी गुंडा स्कॉड दक्षिण विभागाचे पथक बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी प्रवाशांचे मोबाईल हिसकाविणारे दोघे जण दुचाकीवर पुणे स्टेशन परिसरात येणार आहेत, अशी माहिती बुधवारी रात्री पोलिस नाईक अजय उत्तेकर, आणि पोलिस शिपाई राकेश खुणवे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने स्टेशनसमोरील स्वामी समर्थ मंदिरासमोरील रस्त्यावर सापळा रचून दुचाकीवरील दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असताना त्यांनी पुणे स्टेशन आणि स्वागरेट परिसरात रात्री ११ ते पहाटे ५ या कालावधीत रस्त्याने मोबाईलवर बोलत जाणाऱ्या प्रवाशांना लुबाडल्याचे कबुल केले़. त्यांच्याकडून मोपेड आणि ८ मोबाईल जप्त केले आहेत. अशा प्रकारे दोघांनी आणखी गुन्हे केले असल्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक राम राजमाने, पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सहायक फौजदार राजेंद्रसिंग चव्हाण, पोलीस हवालदार सुनिल चिखले, विजय गुरव, सर्फराज शेख, किरण ठवरे, प्रविण पडवळ, कैलास साळुंखे, निलेश शिवतरे यांनी केले़................................प्रवास करून रेल्वेस्टेशन, एस टी बसस्थानकात उतरल्यानंतर बाहेर गेल्यावर प्रवाशी नातेवाईकांना कॉल करण्यासाठी मोबाईल बाहेर काढतात. या संधीचा गैरफायदा घेत दोघांनी मोबाईल हिसकावून नेले. राजू जाधव हा दुचाकी चालवायचा तसेच रोहित पवार हा मोबाईल हिसकाविण्याचे काम करत असत. दोघांची कौटुंबिक पार्श्वभूमीवर बेताची आहे. पवार याला दारूचे व्यसन आहे. दारुसाठी त्याने चोरलेले महागडे मोबाईल अवघ्या ५०० ते एक हजार रुपयांमध्येही मित्रांना विकले होते, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाArrestअटकPoliceपोलिसMobileमोबाइल