शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

मनसेचा यु टर्न, पुण्यात येणाऱ्या ब्रिजभूषण सिंह यांना विरोध करणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 10:47 AM

मनसेने का घेतली माघार? काय आहे प्रकरण?...

पुणे/किरण शिंदे :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याला भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी प्रखर विरोध केला होता. त्यामुळे राज ठाकरे यांना अखेर आपला अयोध्या दौरा रद्द करावा लागला होता. मात्र आता तेच ब्रिजभूषण सिंह येत्या काही दिवसात पुणे शहरात येणार आहेत. महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या निमित्ताने ते पुण्यात येणार आहेत. यावेळी सर्वांचे लक्ष हे मनसेच्या भूमिकेकडे होते. मात्र आता मनसेच्या भूमिकेने सर्वांनाच कोड्यात टाकले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ब्रिजभूषण सिंह यांना कोणताही विरोध करणार नाही, अशी माहिती मनसेने ते वसंत मोरे यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देताना वसंत मोरे म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही भूमिका राज ठाकरे यांनीच ठरवली आहे. ब्रिजभूषण सिंग यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान महाराष्ट्र सैनिक किंवा पक्षाचा इतर कोणताही नेता यांची याविषयी कुठलीही प्रतिक्रिया येणार नाही. राज ठाकरेंचा आदेश यामुळे सर्व मनसैनिक शांत आहेत. 

राज ठाकरेंचा आदेश-

प्रकृतीच्या कारणामुळे राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर गेले नव्हते. यामध्ये इतर कुठलाही विषय नव्हता. राज ठाकरे जरी अयोध्येला गेले नव्हते तरी मनसैनिकांनी आयोजित जाऊन दर्शन घेतलं होते. त्यामुळे महाराष्ट्र सैनिकाची ताकद किती आहे हे संपूर्ण देशाला माहित आहे. अन्यथा आमच्याही अंगाला लाल माती लागली आहे. कुस्ती कशी खेळायची याविषयी देखील आम्हाला चांगलेच माहित आहे. मात्र राज ठाकरे यांचा आदेश असल्यामुळे ब्रिजभूषण सिंग यांना मनसे विरोध करणार नाही, असेही वसंत मोरे म्हणाले. 

ब्रिजभूषण सिंग यांचे आम्ही स्वागत करू-

राजकारणात कुणीही शत्रू नसतो, त्याप्रमाणे कुस्तीचे नियम देखील तसेच आहेत. पराभव झाल्यानंतर सुद्धा कुस्तीतले पैलवान एकमेकांची गळाभेट घेत असतात. ही महाराष्ट्राची संस्कृती असल्यामुळे त्याप्रमाणेच ब्रिजभूषण सिंग यांचे आम्ही स्वागत करू असे देखील वसंत मोरे यांनी सांगितले..

टॅग्स :PuneपुणेMNSमनसेUttar Pradeshउत्तर प्रदेशWrestlingकुस्ती