शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

मनसेचा नादच खुळा, कोविड रुग्णांची लूट थांबविण्साठी हॉस्पीटलबाहेरच झळकावले बॅनर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 16:51 IST

शासनमान्य दराने देयकांची आकारणी केल्याबाबतची खात्री करण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यातील रुग्णालयासाठी लेखा अधिकाऱ्यांच्या पथकाची नियुक्ती केली आहे.

ठळक मुद्देशासनमान्य दराने देयकांची आकारणी केल्याबाबतची खात्री करण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यातील रुग्णालयासाठी लेखा अधिकाऱ्यांच्या पथकाची नियुक्ती केली आहे.

मुंबई - कोविड उपचारासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या हॉस्पीटलकडून आकारण्यात येणाऱ्या बिलांबाबत मोठ्या प्रमाणात तफावत आढळल्याचे दिसून येत आहे. काही रुग्णांकडून लाखोंची बिले आकारण्यात येत असल्याचे सोशल मडियातून उघडकीस आले आहे. यासंदर्भात मनसेने प्रश्न लावून धरल्यानंतर राज्य सरकारने बिलांच्या तपासणीसाठी लेखा परीक्षकांची नेमणूक केली आहे. मात्र, एक दिवसाची बातमी होऊन गेली, पुन्हा जनजागृती नाही किंवा रुग्णालयाबाहेर या अधिकाऱ्यांची माहितीही नाही. आता, पुण्यातील मनसेनं 25 रुग्णालयाबाहेर बॅनर झळकावले आहेत.

शासनमान्य दराने देयकांची आकारणी केल्याबाबतची खात्री करण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यातील रुग्णालयासाठी लेखा अधिकाऱ्यांच्या पथकाची नियुक्ती केली आहे. कोविड उपचारासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या हॉस्पीटलकडून आकारण्यात येणाऱ्या बिलांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी होत आहेत. त्या अनुषंगाने शासनमान्य दराने देयकांची आकारणी केल्याबाबतची खात्री करण्यासाठी लेखा अधिकाऱ्यांच्या पथकाची नियुक्ती केली आहे. लेखा तपासणी पथक देयकांच्या अनुषंगाने नर्सिंग, आयसोलेशन, आयसीयु चार्जेस, रूम रेंट, कन्सल्टेशन, विविध चाचण्या, ऑक्सीजन, औषधे आदिंच्या शुल्क आकारणीबाबत काटेकोरपणे तपासणी करीत आहे. तसेच, जादा बिल घेणाऱ्या रुग्णांवर कारवाईचा बडगाही उगारण्यात येत आहे. मात्र, रुग्णाने तक्रार केल्यानंतर ही प्रक्रिया पार पडते.

पुण्यातील मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी पुणे शहरातील 25 मोठ्या रुग्णालयाबाहेर बॅनर झळकावले आहेत. या बॅनरवर संबंधित रुग्णालयाच्या लेखा परीक्षण अधिकाऱ्याचे नाव व संपर्क क्रमांक टाकण्यात आला आहे. ''पुणे शहरातील २५ हॉस्पिटलला आम्ही असे बोर्ड  लावतोय. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे ज्यांना ज्यांना हे बोर्ड तुमच्या भागातील हॉस्पिटलसमोर दिसतील त्यांचे फोटो काढा आणि ते तुमच्या भागातील whatsapp ग्रुपवर किंवा fb ला टाका जेणेकरून तुमच्यामुळे एका तरी रुग्णाचे बिल कमी झालेच पाहिजे'', असे आवाहनही वसंत मोरे यांनी केले आहे. 

 

टॅग्स :MNSमनसेPuneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल