शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मनसे-उद्धवसेनेचे शहरप्रमुखही एकत्र;हिंदी सक्तीविरोधात ५ जुलैला निघणाऱ्या मोर्चासंबंधी केली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 20:01 IST

दोघांनीही आपापल्या नेत्यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला व त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाला टीकेचे लक्ष्य केले. आमच्या एकत्र येण्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

पुणे :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहरप्रमुख साईनाथ बाबर व उद्धवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे शनिवारी दुपारी मनसेच्या पक्ष कार्यालयात एकत्र आले. हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात मुंबईतील ५ जुलैला निघणाऱ्या मोर्चासाठी पुण्यातून करायच्या नियोजनासंबंधी त्यांनी एकत्रित चर्चा केली. शहराच्या राजकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय झाला.

दोघांनीही आपापल्या नेत्यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला व त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाला टीकेचे लक्ष्य केले. आमच्या एकत्र येण्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कसलेही काम न करता केवळ पक्षांची फोडाफोटी, सरकारी यंत्रणाचा गैरवापर, भ्रष्टाचारी नेत्यांना पक्ष प्रवेश असे कोणतेही नीतिमूल्य नसलेले राजकारण करण्यासाठीच भाजप प्रसिद्ध आहे. दिल्लीतील सरकार तेच करते आहे व राज्यातील सरकारही त्याचीच री ओढत आहे, अशी टीका मोरे व बाबर यांनी केली.

ही युती पुढे राहील का?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही एकत्रच लढवल्या जातील का? हा पुढचा विषय आहे. आता आमच्यासाठी महत्त्वाचा विषय मुंबईतील मोर्चाचे नियोजन हाच आहे, त्यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत. हा मोर्चा यशस्वी होणार यात शंका नाही, मात्र तो अधिक यशस्वी व्हावा, अविस्मरणीय व्हावा, त्यात पुणे शहर जिल्ह्याचे योगदान असावे, असा आमचा प्रयत्न आहे. आमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते त्यासाठी प्रयत्नशील आहेत, असे मोरे व बाबर यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMNSमनसेhindiहिंदीmarathiमराठी