शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

काँग्रेसच्या बंदमध्ये मनसे, राष्ट्रवादीचा सक्रिय सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2018 8:31 PM

काँग्रेसच्या बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, संभाजी ब्रिगेड आदी विविध पक्षांनी सक्रिय पांठिबा दिला आहे.

पुणे:  पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने अवास्तव आणि अन्याय्य दरवाढ होत असल्याच्या निषेधार्थ, मोदी मुक्त भारत, मोदी हटवा देश वाचवा मोहिम हाती घेत काँग्रेस पक्षाने सोमवार (दि. १०) रोजी भारत बंद पुकारला आहे. काँग्रेसच्या बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण  सेना, संभाजी ब्रिगेड आदी विविध पक्षांनी सक्रिय पांठिबा दिला आहे. मनसेच्या वतीने रविवारी शहरातील लक्ष्मीरस्त्यासह प्रमुख बाजारपेठांमध्ये रॅली काढून बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.

    भारत बंदच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील काँग्रेस भवन येथे काँग्रेस कमिटीच्या चिटणीस व महाराष्ट्राच्या सहप्रभारी सोनल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत व शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी विविध व्यापारी संघटना, रिक्षा संघटना, हमाल पंचायत , शैक्षणिक संस्था , सराफ व्यावसायिक, पेट्रोल डीलर असोसिएशन आदींना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे बागवे यांनी सांगितले. बंदा निमित्त दुपारी १२ वाजता ट्रायलक हॉटेल, पुणे कॅम्प येथे काँग्रेस पक्षाचे सर्व नेते , पदाधिकारी जमून कॅम्पमधील विविध व्यापारी संघटनांना व दुकानदारांना बंद पाळण्याचे आवाहन करणार आहेत. या बैठकीस माजी आमदार मोहन जोशी, अ‍ॅड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, नीता रजपूत, अजित दरेकर, रमेश अय्यर, संगिता तिवारी, चैतन्य पुरंदरे, सचिन आडेकर व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनसेचा सक्रिय सहभागमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भारत बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व प्रमुख पदाधिका-यांची बैठक घेऊन बंदात सक्रिय सहभाग घेण्याचे निश्चित करण्यात आले. बंद शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी रविवारीच सर्व प्रमुख बाजार पेठांमध्ये रॅली काढून व्यापा-यांना बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.- अजय शिंदे, मनसे शहर प्रमुख

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसMNSमनसे