मनसेच्या पदवीधर उमेदवार रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:39 IST2020-11-22T09:39:01+5:302020-11-22T09:39:01+5:30
पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील मनसेच्या उमेदवार रूपाली पाटील यांना सातारा जिल्ह्यातून एका तरुणाने फोन करून ''''''''जिथे असशील ...

मनसेच्या पदवीधर उमेदवार रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी
पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील मनसेच्या उमेदवार रूपाली पाटील यांना सातारा जिल्ह्यातून एका तरुणाने फोन करून ''''''''जिथे असशील तिथे संपवून टाकू. आमदार होण्याचा प्रयत्न करू नकोस'''''''' अशी धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. धमकी देणाऱ्या अज्ञाताविरोधात पाटील यांनी पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून संबंधिताच्या अटकेची मागणी त्यांनी केली आहे.
मनसेच्या अध्यक्ष पाटील यांनी नुकताच सातारा जिल्हा दौरा केला. शनिवारी त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात नंबरवरून फोन आला. ''''''''मी सातारा जिल्ह्यातून लबाडे बोलत असून, आमदार होण्याचा प्रयत्न करू नकोस. अन्यथा पुण्यात जिथे असशील तिथे संपवून टाकू,'''''''' अशी धमकी देण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. पाटील रविवारपासून पुन्हा सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी सुरक्षा पुरविण्याची मागणी केली आहे.