शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवरून मनसेचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा        

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 13:54 IST

सर्वोच्च न्यायालयाने वाहन चोरीला आळा घालण्यासाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट सक्तीची करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले

पुणे - राज्यात हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसंदर्भात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. २०१९ पूर्वीच्या वाहनांसाठी ही नंबर प्लेट सक्तीची करण्यात आली आहे, मात्र या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली आहे. मनसेचे प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवत हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे.   सरकारचा निर्णय सर्वसामान्यांवर अन्यायकारी  सर्वोच्च न्यायालयाने वाहन चोरीला आळा घालण्यासाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट सक्तीची करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले होते. त्यानुसार महाराष्ट्रासह अनेक राज्यांत त्याची अंमलबजावणी सुरू झाली. मात्र, कोट्यवधी वाहनधारकांना हा नियम सक्तीचा करून सरकार त्यांच्यावर अन्याय करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.  अजय शिंदे म्हणाले, "हा निर्णय सामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करायला लावणारा आहे. यातून सरकारला दंडाच्या रूपात जबरदस्तीने पैसे वसूल करता येतील. या नव्या नियमामुळे भ्रष्टाचाराचे नवे कुरण निर्माण होईल. महाराष्ट्र सरकारने काही निवडक कंपन्यांना या नंबर प्लेट पुरवण्याचे कंत्राट दिले आहे, त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेत गैरव्यवहाराची शक्यता आहे."  सरकारने फेरविचार करावा - मनसेची मागणी  मनसेने हा नियम रद्द करण्याची मागणी करत मुख्यमंत्री फडणवीस यांना थेट पत्र पाठवले आहे. "सरकारने न्यायालयाचा आदेश ढाल बनवून हा निर्णय लादू नये. २०१९ पूर्वीच्या वाहनांसाठी हा नियम ऐच्छिक ठेवावा," अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. राज्यात अनेक वाहनधारक या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करत आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसPoliceपोलिसRto officeआरटीओ ऑफीस