Raj Thackeray: 'अरे तु काय सरदार वल्लभभाई पटेल आहेस का?'; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2022 12:11 IST2022-05-22T12:10:39+5:302022-05-22T12:11:30+5:30
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज पुण्याच्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

Raj Thackeray: 'अरे तु काय सरदार वल्लभभाई पटेल आहेस का?'; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
पुणे- संभाजीनगरचा उल्लेख करताना, नामांतर करण्याची गरजच काय, ते आहेच संभाजीनगर, असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. उद्धव ठाकरेंच्या या विधानाचा चांगलाच समाचार मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी आज पुण्यातील सभेत घेतला.
संभाजीनगर नाव होवो की न होवो, मी म्हणतोय ना?... अरे तू कोण आहे?, सरदार वल्लभभाई पटेल की महात्मा गांधी?, असा सवाल उपस्थित करत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसेच लवकरात लवकर औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करा, अशी मागणी देखील राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
तुमच्या अंगावर आंदोलन केल्याची एक तरी केस आहे का?, असा सवालही राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे. आमच्या महाराष्ट्रात एमआयएमची औलाद येते आणि औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकतात. आम्हाला लाज, शरम वाटत नाही. कारण सत्ताधारीच असे बसलेत, असंही राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, उत्तर प्रदेशमधील बृजभूषण सिंह यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला. अयोध्या दौऱ्याआधी, मी माफी मागावी याची मागणी केली, यांना आता १२-१४ वर्षांनंतर जाग आली. यातून चुकीचे पायंडे पडत आहेत. विषय माफी मागण्याचाच आहे ना मग गुजरातमध्ये अल्पेश ठाकूर नावाच्या नेत्यांनं यूपी,बिहारच्या लोकांना हाकलून दिलं. ती लोकं मुंबईत आले, इथं आओ जाओ घर तुम्हारा. तिथं गुजरातमध्ये कोण माफी मागणार, असं राज ठाकरे म्हणाले. हे राजकारण समजून घेणं गरजेचं आहे. यांना आपलं हिंदूत्व झोंबलं, लाऊडस्पिकर झोंबले, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.