शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

महाविकास आघाडी सरकारचे आमदारच असुरक्षित; तर सर्व सामान्य जनतेचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 17:06 IST

शिरूर - हवेली मतदार संघातील सर्वपक्षीय नागरीकांनी आमदार अशोक पवार यांना दिलेल्या धमकीचा निषेध करत आरोपी चा तात्काळ शोध घेऊन कारवाई करण्याची व आमदार पवार यांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी निवेदनाव्दारे पोलीस प्रशासनाकडे केली

शिरूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात सत्तेतील आमदारच असुरक्षित तर सर्व सामान्य जनतेचे काय? असा प्रश्न शिरुर हवेली मतदारसंघांतील नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे. शिरूर - हवेलीचे आमदार अँड. अशोक पवार यांना सुमारे दोन महिन्यापूर्वी निनावी पत्राव्दारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. 

याबाबत मतदार संघातील सर्वपक्षीय नागरीकांनी आमदार अशोक पवार यांना दिलेल्या धमकीचा निषेध करत आरोपी चा तात्काळ शोध घेऊन कारवाई करण्याची व आमदार पवार यांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी निवेदनाव्दारे पोलीस प्रशासनाकडे केली. जनमताचा रेटा पहात आमदार अशोक पवार यांना पोलीस कर्मचारी संरक्षणा साठी देण्यात आले. या घटनेला दोन महिने होत आले आहेत. परंतु लाखो नागरिकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या शिरुर हवेलीतील आमदार अशोक पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीं चा शोध लागला नाही का? हा गृह खात्याचा हलगर्जीपणा का? पोलीस प्रशासनाचे तपास कार्यातील अपयश याबाबत संभ्रम आहे. 

लोकप्रतिनिधीची ही अवस्था तर सर्व सामान्य जनतेचे काय? सर्व सामान्य नागरीकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडुन हे पोलिस प्रशासन न्याय देईल काय? असा सवाल जनसामान्य नागरिक करत आहेत. त्यामुळे या प्रकरणातील आरोपी तात्काळ उघड होऊन पोलीस प्रशासनाने जनसामान्यांच्या प्रति विश्वासार्हता टिकून राहण्यासाठी कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत जाणकार नागरिक व्यक्त करत आहेत.

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीMLAआमदारShirurशिरुरPoliceपोलिस