MLA Shivendra Raje Bhosale met Deputy Chief Minister Ajit Pawar in Baramati | आमदार शिवेंद्रराजे भोसले बारामतीत, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घेतली भेट

आमदार शिवेंद्रराजे भोसले बारामतीत, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घेतली भेट

ठळक मुद्देलोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार शिवेंद्रराजे यांची जवळीक वाढल्याचे दिसून येत आहे. तसेच पवार यांच्या सातारा दौऱ्यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांनी पवार यांची भेट घेतली होती.

बारामती - सातारचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आज बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मात्र ही भेट राजकीय नसल्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलेले सातारचे आमदार शिवेंद्रराजे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामतीत भेट घेतली. येथील विद्या प्रतिष्ठान मध्ये बंद खोलीत बराच वेळ चर्चा झाली. या चर्चेदरम्यान बंद खोलीत दोघांशिवाय अन्य कोणालाही प्रवेश नव्हता.

भेटीमागे राजकीय हेतू नाही....

लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार शिवेंद्रराजे यांची जवळीक वाढल्याचे दिसून येत आहे. तसेच पवार यांच्या सातारा दौऱ्यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांनी पवार यांची भेट घेतली होती. आता ते थेट बारामतीला भेटीसाठी आले होते. या दोघांच्यात बंद खोलीत झालेल्या चर्चेचा तपशील मिळाला नाही. सदर चर्चेनंतर शिवेंद्रराजे भोसले यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की, माझ्या मतदारसंघातील विकासकामा संबंधी चर्चेसाठी पवार यांच्या भेटीला आलो असल्याचे सांगितले. या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नाही.असे त्यांनी सांगितले.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: MLA Shivendra Raje Bhosale met Deputy Chief Minister Ajit Pawar in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.