शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील शाळेची 'मोगलाई'; मुलींच्या अंतर्वस्त्राचा रंग, पाणी पिण्याच्या वेळेवर निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 13:44 IST

जाचक नियमांमुळे पालकांचा संताप

पुणे: मुलांना शाळेत शिस्तीचे धडे मिळतात. मात्र पुण्यातील एमआयटी विश्वशांती गुरुकुल शाळेत मुलांना आयुष्यभराचा 'धडा' शिकवला जातोय का? असा प्रश्न पालिकांकडून उपस्थित केला जात आहे. पौड रोडवरील विश्वशांती गुरुकुल शाळेनं विद्यार्थ्यांसाठी अतिशय कठोर नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावलीतून शाळेनं विद्यार्थ्यांच्या पाणी पिण्याच्या आणि स्वच्छतागृहात जाण्याच्या वेळादेखील निश्चित केल्या आहेत. त्यामुळे पालकांमध्ये संताप आहे. विश्वशांती गुरुकुल शाळेनं विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या नियमावली संदर्भात पालकांना शपथपत्रावर स्वाक्षऱ्या करण्यास सांगितलं आहे. विशेष म्हणजे यामध्ये भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांचा उल्लेख आहे. पालकांनी नियम न पाळल्यास शाळा प्रशासनाकडून त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली जाऊ शकते. शाळेच्या नियमावलीतील अनेक बाबी धक्कादायक आहेत. विद्यार्थ्यांच्या पाणी पिण्याच्या, स्वच्छतागृहात जाण्याच्या वेळा नियमावलीत देण्यात आल्या आहेत. इतकंच नव्हे, तर विद्यार्थिनींनी कोणत्या रंगाचं अंतर्वस्त्र घालावं, हेदेखील शाळेनं नियमावलीत नमूद केलं. शाळेनं विद्यार्थ्यांना दिलेल्या डायरीत हे सर्व नियम दिले आहेत. याबद्दल पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शाळेच्या विद्यार्थिनींनी क्रिम किंवा पांढऱ्या रंगांचीच अंतर्वस्त्र घालावीत, असं शाळेनं नियमावलीत म्हटलं आहे. याशिवाय स्वच्छतागृहात जाण्यासाठीही विद्यार्थ्यांना वेळ निश्चित करुन देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या पाणी पिण्यावरही शाळेनं निर्बंध आणले आहेत. हे नियम न पाळल्यास पालकांकडून दंड आकारला जाईल. याबद्दल पालकांमध्ये नाराजी आहे. 'विद्यार्थ्यांना शिस्त लावावी, याला आमचा विरोध नाही. मात्र त्याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात जागरुकता निर्माण करायला हवी. तर विद्यार्थी स्वत:हून शिस्त पाळतील. शाळेनं अशा पद्धतीनं दंड आकारायला नको,' असं ज्योती निर्मळ यांनी म्हटलं. ज्योती निर्मळ यांची मुलगी चौथीत शिकते. तर आधी आलेल्या वाईट अनुभवांवरुन आम्ही या नियमांचा समावेश डायरीत केल्याचं एमआयटी समूहाच्या कार्यकारी संचालिका स्वाती चाटेंनी सांगितलं. 'पालकांना आक्षेप आल्यास त्यांनी आमच्याशी किंवा मुख्याध्यापकांशी त्याबद्दल संवाद साधला,' असंही त्या म्हणाल्या.  

टॅग्स :mitएमआयटीPuneपुणेStudentविद्यार्थीSchoolशाळा