शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पुण्यातून ९ वर्षांपूर्वी गायब झालेला तरुण बनला माओवादी कमांडर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 14:02 IST

भवानी पेठेतील कासेवाडी झोपडपट्टी येथे तो राहायला होता. मात्र,नोव्हेंबर २०१०पासून बेपत्ता होता.

ठळक मुद्दे २५ मार्च २०१९ या दिवशी बनवण्यात आलेल्या या यादीत पुण्यातील २८ वर्षाच्या विश्वाचा समावेश

पुणे : पुण्यातून ९ वर्षांपूर्वी गायब झालेला तरुण छत्तीसगडमध्ये माओवादी गटाचा कमांडर झाल्याचे समोर आले आहे. याबाबत छत्तीसगडपोलिसांनी जाहीर केलेल्या माओवाद्यांच्या यादीत या व्यक्तीचा समावेश आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष वसंत शेलार ऊर्फ विश्वा हा भवानी पेठेतील कासेवाडी झोपडपट्टी येथे राहायला होता. तो नोव्हेंबर २०१०पासून बेपत्ता असून जानेवारी २०११मध्ये त्या संबंधीची तक्रार खडक पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. तो विश्वा नावाने ओळखला जातो

. छत्तीसगड पोलिसांनी कार्यरत असणाऱ्या माओवाद्यांच्या यादीत विश्वा हा राजनंदगावामधील तांडा विभागातील माओ कमिटीचा डेप्युटी कमांडर असल्याचे म्हटले आहे. २५ मार्च २०१९ या दिवशी बनवण्यात आलेल्या या यादीत पुण्यातील २८ वर्षाच्या विश्वाच्या नावासह छायाचित्रही सामील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांडा विभागात १४ व्यक्तींचा समावेश असून विश्वा याचा क्रमांक चौथा आहे. शिवाय त्याच्याकडे ३०३ क्रमांकाची रायफलही आहे. त्याच्या छायाचित्रावरुन त्याची ओळख पटली आहे़ त्याच्या वैयक्तिक माहितीमध्ये त्याने इयत्ता ९ वीनंतर शाळा सोडल्याचे समजते. तो त्याच्या चित्रकलेसाठी ओळखला जात होता. त्याने पुण्यातील कबीर मंचामध्ये सहभाग नोंदवल्याचे समजते. मुंबईला प्रदर्शनाच्या कामासाठी जाण्याचे कारण सांगून ७ नोव्हेंबर २०१० मध्ये घरातून बाहेर पडला़. त्यावेळी त्याने आपल्याला दोन महिन्यांसाठी मुंबईच्या प्रदर्शनासाठी काम मिळाले तो बाहेर पडला, असे त्याच्या कुटुंबीयांनी नोंदवलेल्या तक्रारीत म्हटले आहे.    याशिवाय त्याच्यासोबत गायब झालेल्या पुण्यातील अजून एका युवकही बंदी असलेल्या माओ गटात सहभागी झाल्याचे समजते. प्रशांत कांबळे हा पुण्यातील ताडीवाला रस्त्यावरील झोपडपट्टी भागात राहणारा युवक शेलारसोबत बेपत्ता झाला होता. २०११ साली महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने कबीर कला मंचच्या काही सभासदांना अटक केली होती. यावेळी कांबळे व शेलार फरार झाले होते. ़़़़़़़़़* मुलाची आठवण येते पण कुठे आहे माहिती नाही याबाबत संतोषचे ६५वर्षांचे वडील वसंत शेलार म्हणतात की, तो लहानपणापासून अतिशय प्रेमळ मुलगा होता. अगदी सुरुवातीपासून त्याला चित्रकलेत रस होता. मुलाची आठवण येते पण तो कुठे आहे याची माहिती नाही. या बाबतीत पोलीस किंवा कोणत्याही व्यक्तीने संपर्क केलेला नाही. 

टॅग्स :PuneपुणेChhattisgarhछत्तीसगडPoliceपोलिसnaxaliteनक्षलवादीCrime Newsगुन्हेगारी