शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

पाकव्याप्त काश्मीरमधील बांधकामे चुकीची, चिनी सामरिक तज्ज्ञांमध्ये मतमतांतर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 03:16 IST

चीनमधील पाकव्याप्त काश्मीर येथे सुरू असलेली बांधकामे तसेच त्या परिसरातील धोरणांबाबत चिनी सामरिक तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे दिसून येत आहेत. दुर्गम भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करून काय साध्य होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आशिया खंडातील दोन मोठे देश असलेल्या भारत आणि चीनमध्ये सीमाप्रश्नासह काही मुद्द्यांवर वादविवाद आहेत.

पुणे : चीनमधील पाकव्याप्त काश्मीर येथे सुरू असलेली बांधकामे तसेच त्या परिसरातील धोरणांबाबत चिनी सामरिक तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे दिसून येत आहेत. दुर्गम भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करून काय साध्य होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आशिया खंडातील दोन मोठे देश असलेल्या भारत आणि चीनमध्ये सीमाप्रश्नासह काही मुद्द्यांवर वादविवाद आहेत. डोकलामचा तिढा नुकताच सुटला असला, तरी सीमा प्रश्न लवकर मार्गी लागला पाहिजे. त्यासाठी राजकीय नेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा. आपापला हट्ट सोडून काही पावले मागे आल्यास हा प्रश्न सुटू शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.पुण्यातील पुणे इंटरनॅशनल सेंटर अर्थात पीआयसी, पॉलिसी पर्स्पेक्टिव्ह फाउंडेशन, द ट्रिब्यून ट्रस्ट, आणि सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड स्ट्रॅटेजिक स्टडीज अर्थात सीएएसएस या संस्थांतर्फे आयोजित ‘पुणे डायलॉग आॅन नॅशनल सिक्युरिटी-२०१७’ (पीडीएनएस) या सुरक्षाविषयक तज्ज्ञांच्या परिषदेचे आयोजन यशदा येथे करण्यात आले होते. या परिषदेस चीन येथील फुदान विद्यापीठातील ‘इस्टिट्यूट आॅफ इंटरनॅशनल अफेअर्स’ विभागाचे प्रमुख प्रा. शेन डिंगली यांंनी ‘लोकमत’शी संवाद साधला.डिंगली म्हणाले, चीन पाकव्याप्त काश्मीरच्या दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे काम केले जात आहे. वास्तविक पाहता या जागा वादातीत आहेत. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार अशा जागेत काम करणे चुकीचे आहे. मात्र, तरीसुद्धा या ठिकाणी कामे होत आहेत. इंडो पॅसिफिक योजनेद्वारे चीनला शह देण्याचा प्रयत्न केला जात आहे. वास्तविक पाहता योजनेद्वारे चीनला काही फरक पडणार नाही.आशिया खंडातील दोन मोठे देश असलेल्या भारत आणि चीनमध्ये सीमाप्रश्नासह काही मुद्द्यांवर वादविवाद आहेत. डोकलामचा तिढा नुकताच सुटला असला, तरी सीमा प्रश्न लवकर मार्गी लागला पाहिजे. त्यासाठी राजकीय नेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा. आपापला हट्ट सोडून काही पावले मागे आल्यास हा प्रश्न सुटू शकेल, त्याचबरोबर डोकलामबाबत भूतान व चीनमध्ये पूर्वीपासून वाद आहे. अशा परिस्थितीत चीनने तिथे रस्त्याचे काम करणे चुकीचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.चीनचा नॉर्थ कोरियाच्या भूमिकेला विरोध आहे. याबाबत वेळोवेळी चीनने त्या देशाला समज दिली आहे. नॉर्थ कोरियाने केलेल्या हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्याने आशिया खंडातील परिस्थिती अस्थिर बनली आहे.- प्रा. शेन डिंगली

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिर