शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 10:29 IST

Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारणावरून गोळीबार झाल्याने पुण्यात पुन्हा एकदा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

पुणे: पुण्यात कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीतील गुंडांनी एका व्यक्तीवर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गाडीला साईड न दिल्याच्या किरकोळ कारणावरून कोथरूड भागात मुठेश्वर मित्र मंडळासमोर मध्यरात्री ही घटना घडली.  प्रकाश धुमाळ (वय ३६) असे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सध्या त्याच्यावर कोथरूडमधील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी टोळीतील मयुर कुंभारे, मुसा शेख, रोहीत आखाड आणि गणेश राऊत यांना अटक करण्यात आली आहे. तर इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांच्या दहशतीने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीला साईड न दिल्यामुळे हा वाद झाल्याचे कळते आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश धुमाळ हा रात्री मित्रांसोबत उभा होता. त्यावेळी दुचाकीला साईड न दिल्यामुळे या घायवळच्या टोळीतील लोकांसोबत त्याचा वाद झाला. त्यानंतर टोळीतील मयुर कुंभारे, मुसा शेख, रोहीत आखाड आणि गणेश राऊत यांनी गोळीबार केला. मयुर कुंभारेने तीन गोळ्या झाडल्या. यात प्रकाश धुमाळच्या मानेला आणि मांडीला गोळी लागली. गोळ्या लागल्यानंतर प्रकाश तशाच अवस्थेत आपला जीव वाचवण्यासाठी पळत होता. त्या ठिकाणी रक्ताचे आणि पायाचे ठसे दिसून येत आहेत. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला, परिसरात त्यांचं रक्त पडल्याचं दिसून आले आहे. कोथरुडमधील सह्याद्री रुग्णालयात जखमीवर उपचार सुरु आहेत‌. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे तो आपल्या मित्रांसोबत बोलत उभा होता रस्ता दिला नाही. इतक्या किरकोळ कारणासाठी हा गोळीबार करण्यात आलेला आहे. त्यामुळे पुणे शहरात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

टॅग्स :Puneपुणेkothrud policeकोथरूड पोलीसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिसhospitalहॉस्पिटलFiringगोळीबार