Pune Crime: ‘तू मला आवडतेस’ असे सांगून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
By नम्रता फडणीस | Updated: November 28, 2023 19:05 IST2023-11-28T19:04:42+5:302023-11-28T19:05:31+5:30
भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल...

Pune Crime: ‘तू मला आवडतेस’ असे सांगून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
पुणे : ‘तू मला खूप आवडतेस’ असे सांगत अल्पवयीन मुलीला बेडरूममध्ये घेऊन जात तिच्यावर जबरदस्ती केली. या प्रकरणी पस्तीस वर्षीय तरुणाला अटक केली. स्वप्निल शिरीष तवर (वय ३५, कात्रज) असे आरोपीचे नाव असून, त्याच्यावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी एका निवृत्त पोलिस निरीक्षकाने फिर्याद दिली. त्यानुसार, फिर्यादीची नात १५ वर्षांची आहे. ती क्लासला जात असताना आरोपी तिचा पाठलाग करीत असे. तिला अपार्टमेंटच्या टेरेसवर घेऊन जात जबरदस्तीने मिठी मारायचा. इन्स्टाग्रामवरून वारंवार मेसेज करून त्रास द्यायचा. मला मेसेज करू नको, असे मुलीने सांगितल्याने आरोपी तिला जबरदस्ती बेडरूममध्ये घेऊन गेला आणि त्याने तिच्यासमवेत अश्लील कृत्य करून जबरदस्ती केली.
या प्रकरणी तरुणावर भा.द.वि कलम ३५४, ३५४ ड, ३७६ (२) तसेच पाेस्कोअंतर्गत कलम ३, ४, ११ आणि १२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक तावडे तपास करीत आहेत.