बिर्याणीवरुन झालेल्या किरकोळ वादातून हॉटेल व्यावसायिकासह दोघांवर कोयत्याने वार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 03:33 PM2021-08-22T15:33:16+5:302021-08-22T15:33:37+5:30

आरोपीवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

A minor dispute over a biryani led to a scuffle between the two, including a hotelier | बिर्याणीवरुन झालेल्या किरकोळ वादातून हॉटेल व्यावसायिकासह दोघांवर कोयत्याने वार

बिर्याणीवरुन झालेल्या किरकोळ वादातून हॉटेल व्यावसायिकासह दोघांवर कोयत्याने वार

Next
ठळक मुद्देआरोपींनी जमलेल्या लोकांना व आजु बाजुच्या दुकानदारांना शिवीगाळ करीत दमदाटी करुन केली दहशत निर्माण

पुणे : बिर्याणी घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांबरोबर झालेल्या वादातून कोयत्याने वार करुन हॉटेल व्यावसायिकासह दोघांच्या खुनाचा प्रयत्न केला. ही घटना धायरीतील गणेशनगरमधील बिर्याणी हॉटेलमध्ये शनिवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी मयुर मते (वय ३३, रा. धायरी) यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

मयूर मते यांच्या गारवा बिर्याणी हॉटेलमध्ये शनिवारी दुपारी दोघे जण बिर्याणी घेण्यासाठी आले होते. त्यांच्याबरोबर मते यांची शाब्दीक व किरकोळ बाचाबाची झाली होती. त्याचा राग मनात धरुन दोघांनी त्यांच्या इतर साथीदारांना बोलावून घेतले. त्या दोघांनी व त्यांच्या साथीदारांनी हॉटेलमध्ये घुसून त्यांच्यावर कोयत्यासारख्या धारधार हत्याराने त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने वार केला. तेव्हा हॉटेल मालकाच्या शेजारी उभा असलेल्या कामगार इसराफिल हा मध्ये आल्याने तो वार त्याच्या डाव्या हाताच्या मनगटावर बसून तो गंभीर जखमी झाला.

त्यानंतर त्यांनी पुन्हा वार केल्यावर मते यांनी खुर्चीच्या सहाय्याने त्याचा वार अडविण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांच्या उजव्या हाताच्या करंगळीवर वार होऊन त्यात ते गंभीर जखमी झाले. दोघांच्या साथीदारांनी हॉटेलमधील बिर्याणीची पातेले, झाकणे, खुर्चा व ट्रे इत्यादी साहित्य हॉटेल मालक आणि कामगारांना फेकून मारुन जखमी केले.

हा प्रकार पाहून हॉटेल समोर लोकांची गर्दी झाली होती. तेव्हा या टोळक्याने जमलेल्या लोकांना व आजु बाजुच्या दुकानदारांना शिवीगाळ करीत दमदाटी करुन दहशत निर्माण केली. सिंहगड रोड पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक दीपक खेडकर तपास करीत आहेत.

Web Title: A minor dispute over a biryani led to a scuffle between the two, including a hotelier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.