शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

दूध संस्था बंद : निवडणूक प्रक्रिया मात्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 1:39 AM

५ वर्षांपासून वेताळेश्वर सहकारी दूध उत्पादक संस्था बंद असून, त्याची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.

दावडी : मांजरेवाडी, पिंपळ (ता. खेड) येथे गेल्या १५ वर्षांपासून वेताळेश्वर सहकारी दूध उत्पादक संस्था बंद असून, त्याची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे; मात्र मनमानी सभासद करून संस्थेचे आॅडिट करून निवडणूक घेण्याची तयारी सुरू झाली आहे.

जो सभासद वार्षिक कमीत कमी २५० लि. दूध डेअरीत पुरवितो, मात्र या गावातून १ लिटरसुद्धा दूध या डेअरीत जात नसताना त्यांना सभासद करून मतदानास पात्र ठरविले आहे. नावापुरत्या असलेल्या संस्था काय कामाच्या, असा प्रश्न ग्रामस्थांनी केला असून, याबाबत मांजरेवाडी ग्रामस्थांनी ही निवडणूक रद्द करावी अशी मागणी सहायक (पदुम) निबंधक सहकार संस्था दुग्ध विभागाकडे केली आहे.

ग्रामीण भागातील दूध संकलन करण्यासाठी उत्पादन वाढविण्यासाठी दूध उत्पादक सहकारी संस्थांची भूमिका फार महत्त्वाची असते. सहकार तत्त्वावर सुरू झालेल्या या संस्थांच्या माध्यमातून दूध उत्पादकांनाही मोठा आधार मिळत आला आहे; काही शेतकऱ्यांकडे गाय, म्हशी नसतानाही त्यांना सभासद करून घेतले असल्याचे चित्र दिसत आहे. आर्थिक पत्रके सादर करून निबंधक कार्यालयात दरवर्षी लेखा परीक्षण अहवाल सादर करुन निवडणुकीसाठी काही सभासदांकडे गाई-म्हशी नसतानाही सभासद नोंदणी केली असल्यांचा आरोप मांजरेवाडी ग्रामस्थांनी केला आहे.मांजरेवाडी येथे वेताळेश्वर दूध उत्पादक संस्था गेल्या १५ वर्षांपासून बंद असूनही निवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. घरातले नात्यातील लोकांना, तसेच धक्कादायक बाब एका घरातील ७ सभासद म्हणून घेण्यात आले आहे. यामध्ये मृत ४ सभासद आहेत. त्यांची ही नावे सभासद म्हणून घेण्यात आली असल्याने सावळा गोंधळ सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठाmilkदूधElectionनिवडणूक