शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
3
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
4
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
5
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
6
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
7
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
8
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
9
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
10
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
11
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
12
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
13
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
14
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
15
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
16
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
17
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
18
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
19
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
20
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला भाजप कार्यकर्त्यांकडून दुग्धाभिषेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 14:19 IST

राज्यात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरुद्ध राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे.

ठळक मुद्देत्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली...

बारामती : 'शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत' अशा शब्दात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्येेष्ठ नेेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्यानंतर राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून विविध ठिकाणी पडळकर यांच्या विरुद्ध आंदोलने करण्यासोबतच संतापजनक प्रतिक्रियांची झोड उठवली गेली. मात्र, दुुुसरीकडे उंडवडी कडेपठार (ता. बारामती) येथे गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला रविवारी (दि. २८) भाजपच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा अभिषेक घालत त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. या प्रकारानंतर पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्दांचा वापरकेल्यानंतर राज्यभरातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून गोपीचंद पडळकर यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. यावर खुद्द शरद पवारांनी पडळकर हे दोनदा अनामत जप्त झालेली व्यक्ती आहे.. उगीच महत्व देऊ नका अशा शेलक्या शब्दात टीका केली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लायकी पाहून बोलावं, सूर्यावर थुंकले तर ती थुंकी आपल्यावरच पडते असे म्हणत पडळकर यांना लक्ष्य केेेेले होते.  याप्रकारे गेले काही दिवस भाजप व राष्ट्रवादी यांच्यामध्ये जोरदार शाब्दीक चकमक सुरू असून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

रविवारी सकाळी गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धअभिषेक करत त्यांच्या समर्थनार्थ भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

आक्षेपार्ह वक्तव्यामुळे पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीसह भाजपच्याही बड्या नेत्यांनी या प्रकरणी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या. बारामतीत भाजपच्या तालुकाध्यक्ष व शहराध्यक्षांनी यात पडळकर यांची पाठराखण करत त्यांना समर्थन दिले. या  प्रकारानंतर सहा प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना तालुका पोलिस ठाण्यात नेले आहे. तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, शहराध्यक्ष सतीश फाळके,जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे, युवामोर्च अध्यक्ष अ‍ॅड. ज्ञानेश्वर माने, उपाध्यक्ष जयराज बागल, विशाल कोकरे, प्रकाश मोरे, प्रमोद खराडे, भाऊसाहेब मोरे व इतर कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित केले.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाSharad Pawarशरद पवारGopichand Padalkarगोपीचंद पडळकरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस