शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

डीक्कीचे मिलिंद कांबळे यांना लखनौ विद्यापीठाची ‘डॉक्टरेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 05:07 IST

उद्योजक ‘पद्मश्री’ मिलिंद कांबळे यांना लखनौ येथील बाबासाहेब आंबेडकर केंद्रीय विद्यापीठाकडून ‘मानद डॉक्टरेट’ पदवीने सन्मानित करण्यात आले.

पुणे : उद्योजक ‘पद्मश्री’ मिलिंद कांबळे यांना लखनौ येथील बाबासाहेब आंबेडकर केंद्रीय विद्यापीठाकडून ‘मानद डॉक्टरेट’ पदवीने सन्मानित करण्यात आले. कांबळे यांनी सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल त्यांना मानद डॉक्टर आॅफ सायन्स (डी.एस्सी) ही पदवी बहाल केली आहे.विद्यापीठाच्या आठव्या पदवी प्रदान समारंभात त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली. लष्कर प्रमुख बिपीन रावत यांच्या हस्ते पदवीप्रदान झाले. कांबळे यांना प्रतिष्ठेचा ‘पद्मश्री’ पुरस्कार २०१३ मध्ये मिळाला. कांबळे हे व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर असून दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स असोसिएशन (डिक्की) या संस्थेची त्यांनी स्थापना केली. ही भारतातील दलित समाजातील पहिली वाणिज्य संघटना आहे.मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, बारामती पाणीपुरवठा योजना या प्रकल्पांबरोबरच बोगदा, धरणे आणि पूल उभारणीमध्ये कांबळे यांनी मोलाचा सहभाग दिला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील पहिले संकेतस्थळ त्यांनी तयार केले असून त्याची नोंद लिम्का बुक आॅफ रेकॉर्डने घेतली आहे. सध्या ते चेअरमन, बोर्ड आॅफ गव्हर्नर्स, आयआयएम जम्मू, राष्ट्रीय एससी-एसटी हबच्या सल्लागार मंडळाचे अध्यक्ष, भारत-मलेशिया मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाचे सहअध्यक्ष, वाणिज्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय उद्योजक पुरस्काराचे; तसेच ज्येष्ठ नागरिक पुरस्काराचे ते ज्युरी सदस्य आहेत.