पिंपरी : मेट्रोची व्हॉट्सॲप तिकीट सेवा सोमवारी (दि. १६) सकाळी सहा ते ११ः४५ पर्यंत बंद करण्यात आली. यामुळे प्रवाशांना तिकीट काढण्यास अडचण निर्माण झाली. सकाळच्या प्रहरात अनेकांना ‘सेवा दिवसभर बंद’ असा संदेश येत होता. त्यामुळे गोंधळ व चिडचिड वाढली. मात्र पावणेबारा वाजता सेवा पुन्हा पूर्ववत करण्यात आली.
मेट्रोच्या जनसंपर्क अधिकारी चंद्रशेखर तांबेकर यांनी सांगितले, “यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीसाठी ही सेवा तात्पुरती बंद ठेवण्यात आली होती. सकाळी सहापासून ते ११ः४५ पर्यंत ही सेवा बंद होती.” मात्र, या काळात प्रवाशांना काय करावे, हे समजत नव्हते. काहींनी मेट्रो स्थानकावर जाऊन काउंटरवर तिकीट काढले, तर काहींनी ऑनलाइन ॲप वापरले, पण व्हॉट्सॲपवर तिकीट मिळत नसल्याने अनेकांना उशीर झाला.
विशेष म्हणजे सकाळी ८ ते १० च्या दरम्यान मेट्रो स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली होती. ‘तिकीट काढायला गेलो तर ‘सेवा बंद’ असा मेसेज आला. दिवसभर बंद असल्याचे वाटले. ऑफिसला उशीर होणार म्हणून चिंता वाटली,’ असे एका प्रवाशाने सांगितले. दुसऱ्याने सांगितले, ‘व्हॉट्सॲपवर एका क्लिकमध्ये तिकीट मिळते म्हणून सर्वजण ही यंत्रणा वापरतात. ती अचानक बंद झाल्याने त्रास झाला.” दररोज हजारो प्रवासी व्हॉट्सॲप सेवेवर अवलंबून असल्याने अशी सेवा अचानक बंद झाल्यास धक्का बसतो, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. मेट्रो प्रशासनाने प्रवाशांना दिलासा दिला की, आता सेवा पूर्णपणे सुरू आहे. यापुढे अशा मेंटेनन्ससाठी आगाऊ सूचना देण्यात येईल.
Web Summary : Pimpri Metro's WhatsApp ticketing faced a six-hour outage, inconveniencing commuters. Many encountered 'service closed' messages during peak hours, causing delays and frustration. Alternative ticketing methods were used. The service resumed, with promises of advance notice for future maintenance.
Web Summary : पिंपरी मेट्रो की व्हाट्सएप टिकट सेवा छह घंटे बंद रहने से यात्रियों को परेशानी हुई। कई लोगों को व्यस्त समय के दौरान 'सेवा बंद' संदेश मिला, जिससे देरी हुई। वैकल्पिक टिकटिंग विधियों का उपयोग किया गया। सेवा फिर से शुरू, भविष्य में सूचना का वादा।