शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

भर पावसात आणि तेही रात्री युध्दपातळीवर सुरु मेट्रोचे काम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 18:12 IST

वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी रात्री काम करण्यात येत असते.

ठळक मुद्दे१२ ते पहाटे ५ यावेळात सुरू वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या ३१ किलोमीटरच्या मार्गाचे चार भाग

पुणे : पावसामुळे इतरत्र कामे थंडावत असली तरी महामेट्रो कंपनीचे मेट्रो मार्ग तयार करण्याचे काम मात्र भर पावसात व तेही रात्री १२ ते पहाटे ५ यावेळात सुरू असते. पहाटे सगळी यंत्र रस्त्यावरून हलवून रस्ता मोकळा केला जातो. वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी रात्री काम करण्यात येत असते.वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या सुमारे ३१ किलोमीटरच्या मार्गाचे कामाच्या सोयीसाठी म्हणून चार भाग केले आहेत. त्यातील वनाज ते सिव्हिल कोर्ट व सिव्हिल कोर्ट ते रामवाडी असे दोन भाग आहेत. पिंपरी चिंचवड ते बोपोडी व बोपोडी ते रेंजहिल कॉर्नर असे दोन भाग आहेत. याशिवाय रेंजहिल ते स्वारगेट असा ५ किलोमीटरचा मार्ग भुयारी आहे. ते काम वेगळे केले आहे.वनाज ते गरवारे महाविद्यालय हा सुमारे ५ किलोमीटरचा मार्ग डिसेंबर २०१९ ला सुरू करण्याचे जाहीर करण्यात आल्यामुळे हे काम प्राधान्याने करण्यात येत आहे. ३० ते ३४ मीटरच्या अंतराने उभ्या असलेल्या खांबांवर मेट्रो मार्गाची उभारणी करण्याचे आव्हान मेट्रो अभियंत्यांपुढे आहे. या रस्त्यावर फार मोठ्या संख्येने वाहतूक आहे. त्यामुळे थोडाही अडथळा निर्माण झाला की लगेचच वाहतूककोंडी होते. त्यामुळेच खांबांमध्ये काँक्रिट टाकण्याचे, त्यावर कॅप बसवण्याचे, दोन खांबांच्या मध्ये सेगमेंट बसवण्याचे काम ठेकेदार कंपनी रात्रीच्या वेळेस करत आहे.अवजड यंत्रांद्वारे ही सर्व कामे करण्यात येतात. काँक्रिट मिक्स करून ते गाडीतून आणण्यात येते. पाईपच्या साह्याने ते खांबांमध्ये ओतले जाते. सेगमेट म्हणजे सिमेंट काँक्रिटचे दोन खांबांच्या मधील गोलाकार तुकडेही प्री कास्ट म्हणजे दुसरीकडे तयार केले जातात. ते गाडीने कामाच्या ठिकाणी आणले जातात व यंत्राच्या साह्याने खांबावर चढवले जातात. या कामांसाठी लागणारी वाहने बरीच मोठी असल्याने दिवसा काम करणे शक्य नाही. त्यामुळे ही सर्व कामे रात्री १२ ते पहाटे ५ यावेळात केली जातात असे उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक अमोल मोहोळकर यांनी सांगितले. वनाज ते गरवारे महाविद्यालयाशिवाय अन्य मार्गांचे कामही रात्रीच्या वेळेसच सुरू असते. रात्री सर्व वाहने कामाच्या ठिकाणी आणली जातात. रस्ता बंद केला जातो. पहाटेच्या आधी सर्व वाहने पुन्हा रवाना केली जातात. गेल्या काही दिवसात रात्रीही जोराचा पाऊस सुरू आहे, मात्र तरीही पावसात सगळे काम सुरू आहे. वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गावर वनाज, आयडियल कॉलनी, आनंदनगर, नळस्टॉप व गरवारे महाविद्यालय अशी ५ स्थानके असून त्यांचे काम दिवसा तसेच रात्रीही सुरू असते. 

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोRainपाऊस