शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

#Metoo : सिंबायाेसिसच्या विद्यार्थीनीसुद्धा लैेंगिक अत्याचाराच्या बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 13:15 IST

सिंबायाेसिस सेंटर फाॅर मिडीया अॅन्ड कम्युनिकेशन विभागातील अाजी व माजी विद्यार्थिनींनी साेशल मिडीयावर लिहीत सिंबायाेसिसमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचे म्हंटले अाहे.

पुणे : हॅशटॅग मी टू ही चळवळ अाता शिक्षणक्षेत्रातही पसरली अाहे. अभिनेत्री, पत्रकार यांनी समाेर येत अापल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटना सांगितल्यानंतर अाता पुण्यातील नामांकित सिंबायाेसिस महाविद्यालयातील विद्यार्थींनी अापले अनुभव कथन केले आहेत. सिंबायाेसिस सेंटर फाॅर मिडीया अॅन्ड कम्युनिकेशन विभागातील अाजी व माजी विद्यार्थिनींनी साेशल मिडीयावर लिहीत सिंबायाेसिसमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचे म्हंटले अाहे. यावर महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना अाेपन लेटर लिहीत लैेंगिक अत्याचाराच्या घटनांबाबत महाविद्यालयातील समितीकडे तक्रार नाेंदविण्यास सांगितले अाहे.     हॅशटॅग मी टू ही अमेरिकेत सुरु झालेली चळवळ भारतातही माेठ्याप्रमाणावर पसरत अाहे. या चळवळीतून अनेक अभिनेत्री, पत्रकारांनी अापल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांना वाच्यता फाेडली अाहे. या चळवळीमुळे अनेक महिला लैेंगिक अत्याचाराविराेधात पुढे येत अाहेत. गेल्या दाेन तीन दिवसांपासून पुण्यातील नावजलेल्या सिंबायाेसिस सेंटर फाॅर मिडीया अॅन्ड कम्युनिकेशन विभागातील अाजी व माजी विद्यार्थीनींनी साेशल मिडीयावर अापले अनुभव कथन केले अाहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली अाहे. सिंबायाेसिसकडून साेशल मिडीयावर विद्यार्थ्यांना अाेपन लेटर लिहीण्यात अाले असून विद्यार्थ्यांना लैंगिक अत्याचाराला सामाेरे जावे लागत असल्यास त्यांनी महाविद्यालयाच्या समितीकडे तक्रार नाेंदवावी असे अावाहन करण्यात अाले अाहे. फेसबुकवर लिहीलेल्या या पत्रात कमिटीतील सदस्यांची नावे देण्यात अाली अाहेत. तसेच विद्यार्थीनींचे नाव गाेपनीय ठेवण्यात येईल असेही सांगण्यात अाले अाहे. 

      याबाबत बाेलताना सिंबायाेसिसच्या प्रधान संचालिका विद्या येरवडेकर म्हणाल्या, साेशल मिडीयाच्या माध्यमातून विद्यार्थीनी तक्रार करत अाहेत. या तक्रारी अाम्ही साेशल मिडीयाच्या माध्यामातून वाचत अाहाेत. या तक्रारींकडे सिंबायाेसिस गांभिर्याने बघत अाहे. अाज सकाळी सिंबायाेसिची उच्चस्तरीय कमिटीने तातडीने बैठक घेऊन या तक्रारींची दखल घेतली. विद्यापीठाची अंतर्गत समिती या तक्रारींबाबत पाऊले उचलत अाहे.अाज दुपारी एक बैठक हाेणार असून यात या सर्व तक्रारींच्या तपासाबाबत चर्चा करण्यात येणार अाहे.  

टॅग्स :PuneपुणेsymbiosisसिंबायोसिसStudentविद्यार्थीsexual harassmentलैंगिक छळ