शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

'कोरोना' संदर्भात सोशल मीडियावर फिरणारा ‘तो’ मेसेज तथ्यहीन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 18:29 IST

'' कोरोना'' विषाणुपासून बचावासाठी कोणतीही शीतपेये, आईस्क्रीम, सीलबंद दुध तसेच ४८ तासांपुर्वी दुधापासून तयार केलेली मिठाईचे सेवन करू नये’....

ठळक मुद्देकोरोना विषाणु भारतातही येण्याचा धोका जागतिक आरोग्य संघटनेने काही बाबतीत खबरदारी घेण्याच्या दिल्या सुचना

पुणे : '' कोरोना'' विषाणुपासून बचावासाठी कोणतीही शीतपेये, आईस्क्रीम, सीलबंद दुध तसेच ४८ तासांपुर्वी दुधापासून तयार केलेली मिठाईचे सेवन करू नये’, असा सोशल मिडियावर फिरणारा मेसेज तसेच एका खासगी कंपनीचे पत्रकातील मजकुर तथ्यहीन असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या साथरोग व संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी स्पष्ट केले आहे. ही माहिती अत्यंत चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.चीनमध्ये कोरोना विषाणुचा फैलाव वेगाने होत आहे. भारतात केरळमध्येही एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे कोरोनाविषयी लोकांच्या मनात भिती निर्माण होऊ लागली आहे. त्यातच सोशल मिडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती देणारा मजकुर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. तसेच अजमेर येथील एका खासगी कंपनीच्या आरोग्य अधिकाऱ्याचे कोरोनासंदर्भातील उपाययोजनांबाबतचे पत्रकही एकमेकांना पाठविले जात आहे. विशेष म्हणजे त्यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्युएचओ) या सुचना असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ लागला आहे. त्यामध्ये स्वच्छतेबाबत देण्यात आलेल्या सुचना मात्र योग्य आहेत. ‘कोरोना विषाणु भारतातही येण्याचा धोका आहे. यापासून बचावासाठी जागतिक आरोग्य संघटनेने काही बाबतीत खबरदारी घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. कोणत्याही प्रकारची शितपेये, आईस्क्रीम, कुल्फी आदी खाऊ नये. कोणत्याही प्रकारे बंद डब्यातील जेवण, जुनाट बर्फगोळा, सीलबंद दुध तसेच ४८ तासांपुर्वी दुधापासून बनविलेली मिठाई खाऊ नये. कमीतकमी पुढील ९० दिवस या सुचनांचे पालन करावे’, असा मजकुर सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ही माहिती अत्यंत चुकीची असल्याचे डॉ. गंगाखेडकर यांनी म्हटले आहे.---------------

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोनाSocial Mediaसोशल मीडियाHealthआरोग्य