कोंढव्यातून सव्वातीन लाखांचे मेफेड्रॉन जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:14 IST2021-02-05T05:14:06+5:302021-02-05T05:14:06+5:30
पुणे : मेफेड्रॉनची तस्करी करून त्याची विक्री करणार्याला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने कोंढव्यातून अटक केली आहे. तौफिक महंमद ...

कोंढव्यातून सव्वातीन लाखांचे मेफेड्रॉन जप्त
पुणे : मेफेड्रॉनची तस्करी करून त्याची विक्री करणार्याला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने कोंढव्यातून अटक केली आहे.
तौफिक महंमद शफी बागवान (वय २६, रा. डी. एड. कॉलेजजवळ, कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. बागवानच्या ताब्यातून ३ लाख २५ हजार रुपयांचे मेफेड्रॉन जप्त करण्यात आले आहे.
अमली पदार्थविरोधी पथक कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्ती घालत असताना बागवान हा संशयास्पदरित्या मिळून आला.त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, त्याच्याकडे ८१ ग्रॅम २७० मिली ग्रॅम मेफेड्राॅन मिळून आला.
बागवान याने कोणाकडून एमडी आणले याची चौकशी करण्यात येत आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंह, पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे यांच्या पथकाने केली.
............
११ गुन्ह्यांत १९ जणांना अटक, ५०७ ग्रॅम एमडी जप्त
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने आतापर्यंत २० लाख ३० हजार ३०० रुपयांचे ५०७ ग्रॅम ५७५ मिलीग्रॅम मेफेड्रॉन जप्त केले आहे. याप्रकरणी ११ गुन्हे दाखल करण्यात आले असून १९ जणांना अटक करण्यात आली आहे. गेल्या ६ महिन्यांत ही कारवाई केली आहे.