शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

मेफेड्रोन विक्रीप्रकरणाची खेड न्यायालयात सुनावणीस प्रारंभ; तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांनी आरोपींना ओळखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 09:45 IST

अमली पदार्थ तस्कर ललित पाटील मुख्य आरोपी असलेल्या चाकणमधील मेफेड्रोन विक्री प्रकरणातील खटल्याच्या सुनावणीला खेड न्यायालयात सुरुवात झाली.

पुणे :अमली पदार्थ तस्कर ललित पाटील मुख्य आरोपी असलेल्या चाकणमधील मेफेड्रोन विक्री प्रकरणातील खटल्याच्या सुनावणीला खेड न्यायालयात सुरुवात झाली. तत्कालीन अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस अधिकारी शाकीर कौसुद्दीन जेनेरी यांनी न्यायालयात आरोपींना ओळखले. मीच दि. ७ ऑक्टोबर २०२० ला चाकण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले.खेड येथील विशेष न्यायाधीश अश्रफ घनवाल यांच्या न्यायालयात विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी शाकीर कौसुद्दीन जेनेरी यांची साक्ष नोंदविली. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने खेड तालुक्यात ७ ऑक्टोबर २०२० रोजी २० किलो मेफेड्रोन (एमडी) जप्त केले होते. तपासात आरोपींनी रांजणगाव येथील कंपनीत तब्बल १३२ किलो आणि रायगड जिल्ह्यातील महाड येथे दहा-पंधरा किलो मेफेड्रोन तयार केल्याची माहिती मिळाली होती. या प्रकरणात पोलिसांनी अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलसह एकूण २० जणांना अटक करून गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यात ललित पाटील ससून रुग्णालयात उपचार घेत असताना मेफेड्रोनची विक्री करत असल्याचे उघडकीस आले होते. पोलिसांनी आरोपींविरुद्ध दि. २८ सप्टेंबर २०२१ रोजी खेड सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणात आठ आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. उर्वरित बारा आरोपी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. या खटल्याच्या सुनावणीला खेड न्यायालयात सुरुवात झाली आहे.ॲड. हिरे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला, तक्रारदार पोलिस अधिकारी यांनी आरोपी ललित पाटील याच्याकडून जो २० किलोचा अमली पदार्थ जप्त केला. त्याचा सविस्तर पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे. त्याबाबतचे पुरावेदेखील त्यांनी न्यायालयात सादर केले आहेत. २० किलो मेफेड्रॉन हे वेगवेगळ्या पिशवीत आढळले होते. त्यातील दोन दोन किलोच्या बॅगा चौघांकडून जप्त करून त्यातील अमली पदार्थ राष्ट्रीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या गुन्ह्यात तक्रारदार यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दरम्यान, यावेळी आरोपींचे वकीलदेखील न्यायालयात हजर होते.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसDrugsअमली पदार्थLalit Patilललित पाटीलCourtन्यायालय