शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

कौटुंबिक हिंसा पीडित महिलेच्या मानसिक आरोग्यासाठी समुपदेशकांनी प्रयत्न करावे - विजया रहाटकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 16:34 IST

 कौटुंबिक हिंसेने पीडित महिला मानसिकदृष्ट्या खचलेली असते, तिला न्याय मिळवून देत असतानाच महिलेला खंबीर करत तिच्या मानसिक स्वास्थ्यासाठी, आनंदी आणि अर्थपूर्ण जीवनासाठी समुपदेशकांनी प्रयत्न करावे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले.

पुणे : कौटुंबिक हिंसेने पीडित महिला मानसिकदृष्ट्या खचलेली असते, तिला न्याय मिळवून देत असतानाच महिलेला खंबीर करत तिच्या मानसिक स्वास्थ्यासाठी, आनंदी आणि अर्थपूर्ण जीवनासाठी समुपदेशकांनी प्रयत्न करावे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले.कौटुंबिक हिंसेच्या संदर्भात समुपदेशनाची गुणवत्ता वाढवणे' हा प्रकल्प मे २०१५ ते डिसेंबर २०१७ या कालावधीत स्त्री अभ्यास केंद्र, आयएलएस विधी महाविद्यालय, पुणे, यांच्या तर्फे आणि स्विस एड इंडिया या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या आर्थिक सहाय्याने राबवला गेला. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत या प्रकल्पांतर्गत आलेल्या अनुभवांचे सादरीकरण करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या.स्त्रियांवर होणारी कौटुंबिक हिंसा हा केवळ भारतातील नव्हे तर जगातील एक गंभीर प्रश्न आहे. महिलेचे शास्त्रीय पद्धतीने समुपदेशन व्हावे, मानसिक आरोग्यात सुधारणा व्हावी, निर्णय क्षमता वाढून पीडित स्त्रियांचे जीवन आनंदी आणि अर्थपूर्ण व्हावे हा समुपदेशकांचा उद्देश असायला हवा. याच दृष्टीने अभ्यास करून तयार करण्यात आलेल्या 'प्रवास सक्षमतेकडे' या समुपदेशन मार्गदर्शिकेचे प्रकाशन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते करण्यात आले.'प्रवास सक्षमतेकडे' या पुस्तकात समुपदेशन म्हणजे काय? त्याचे टप्पे, पीडित महिलेची मानसिकता समजणे ते न्याय मिळवून देणे, समुपदेशकाची भूमिका आदी सर्वंकष विचार मांडण्यात आला आहे. हे पुस्तक देशभरातील समुपदेशकांसाठी संदर्भग्रंथ होऊ शकेल असा विश्वास यावेळी विजया रहाटकर यांनी व्यक्त केला.यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, शामलाताई वनारसे, आयएलएस महाविद्यालयाच्या प्राचार्य वैजयंती जोशी, डॉ जया सागडे, प्रसन्ना इनवल्ली, डॉ शिरीषा साठे, मानसोपचारतज्ञ डॉ कौस्तुभ जोग आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Vijaya Rahatkarविजया रहाटकरPuneपुणे