शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
3
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
5
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
6
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
7
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
8
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
9
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
10
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
11
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
12
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
13
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
14
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
15
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
16
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
17
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
18
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
19
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
20
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

पुणे ते बारामती दरम्यान मेमू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:12 IST

सुप्रिया सुळे : रेल्वेच्या विविध समस्यांवर रेल्वेमंत्र्यांबरोबर चर्चा बारामती: पुणे ते बारामती दरम्यान 'मेमू' (मेनलाईन इलेक्ट्रीक मल्टीपल युनिट ...

सुप्रिया सुळे :

रेल्वेच्या विविध समस्यांवर

रेल्वेमंत्र्यांबरोबर चर्चा

बारामती: पुणे ते बारामती दरम्यान 'मेमू' (मेनलाईन

इलेक्ट्रीक मल्टीपल युनिट ट्रेन) सुरु करण्यात यावी, अशी मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्री पियुष

गोयल यांच्याकडे केली. सुप्रिया सुळे यांच्यासह खासदार सुनील तटकरे आणि

फौजिया खान यांनी गोयल यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले. याबरोबरच

बारामती लोकसभा मतदार संघातील रेल्वेशी संबंधीत विविध विषयांवर सविस्तर

चर्चा करून प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी

त्यांच्याकडे करण्यात आली.

पुणे ते बारामती दरम्यान ‘मेमू’ (मेनलाईन इलेक्ट्रीक मल्टीपल युनिट

ट्रेन) सुरु करण्यात यावी. ही गाडी सुरु झाल्यास प्रवासाचा वेळ आणखी कमी

होण्यास मदत होईल. याशिवाय प्रदूषणही कमी होऊ शकेल. पुणे ते दौंड

दरम्यानच्या मार्गावरील फलाटांची उंची वाढविण्यात आली असून या मार्गाचे

विद्युतीकरण देखील पुर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ‘मेमू’ लवकरात लवकर

सुरू करावी अशी मागणी यावेळी सुळे यांनी केली.

दौंड स्थानकावरुन बहुतांश सुपरफास्ट रेल्वेगाड्यांना जाण्याची परवानगी

देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे-मुंबई प्रगती

(१२१२६ / १२१२५) एक्स्प्रेसला दौंड पर्यंत प्रवासाची परवानगी द्यावी.

पुणे - सिकंदराबाद, चेन्नई - लोकमान्य टिळक टर्मिनस, हमसफर, संपर्क

क्रांती या गाड्यांना दौंड येथे थांबा द्यावा, अशीही मागणी त्यांनी

यावेळी केली.

नीरा, पुरंदर येथील मुस्लिम बांधवांना प्रार्थना स्थळापर्यंत जाण्यासाठी

जीव धोक्यात घालून रुळ ओलांडावा लागतो. याठिकाणी रेल्वेरुळाचे काम होणार

असून येथे या कामासोबतच नागरिकांच्या सोयीसाठी भुयारी मार्गाचे काम करावे,

नीरा स्थानकावर हजरत निजामुद्दीन-गोवा या गाडीला थांबा देण्यात यावा,

अशीही मागणी यावेळी केली. जेजुरी स्थानकाचे विस्तारीकरण सुरु असताना

प्राथमिक शाळा व अंगणवाडीची इमारत पाडण्यात आली होती. ही शाळा व

अंगणवाडीसाठी रेल्वेने पर्यायी जागा उपलब्ध करावी अशीही मागणी यावेळी

मांडली.

जेजुरी-नीरा मार्गावरील सुकलवाडी, रेल्वे गेट क्रमांक २५ येथे भुयारी

मार्ग बांधावा अशी मागणीही यावेळी केली. याशिवाय सुकलवाडी येथे रेल्वे

पुलाखाली पाणी साठू नये याची दक्षता घ्यावी ही सुचनाही केली. जेजुरी

स्थानकावरील पादचारी उड्डाण पुलाचे विस्तारीकरण, रेल्वे स्थानकात

महिलांसाठी वेटींग रुम सुरु करून तेथे महिला आरपीएफ अधिकारी तैनात

करण्यात यावेत अशीही मागणी यावेळी केली. ढालेवाडी रेल्वे गेट ते जेजुरी

स्थानक दरम्यान सर्व्हिस रोड तयार करणे आणि कोळविहिरे येथे उड्डाणपूल

बांधावा या मागण्या यावेळी मांडल्या. चेन्नई एक्सप्रेसचा भिगवण रेल्वे

स्थानक हा थांबा रद्द करण्यात येऊ नये, भिगवण परिसरातील नागरीकांना हे

स्टेशन अतिशय सोयीचे असून येथे हैद्राबाद -मुंबई एक्स्प्रेस गाडीला थांबा

देण्यात यावा, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.

——————————————————

...सहजपूर ,कासुर्डी येथे रेल्वेला थांबा मिळावा

रोजच्या रोज दौंडहून पुणे आणि पुण्याहून पुन्हा दौंड असा रेल्वे प्रवास

करणारे हजारो प्रवासी आहेत. यात कामगार, पोलीस, शेतकरी, छोटे व्यावसायिक,

विद्यार्थी इतकेच नाही तर अन्य अनेक कारणांनी प्रवास करणारे, रुग्ण,

त्यांचे नातेवाईक यांचा समावेश आहे. सहजपुरपासून उरुळी कांचन रेल्वे

स्टेशन साधारण आठ ते दहा किलोमीटर इतक्या अंतरावर असून ते अंतर

प्रवाशांसाठी सोयीचे असल्याने सहजपूर आणि कासुर्डी येथे रेल्वेगाड्यांना

थांबा द्यावा, अशी प्रवाशांची मागणी असल्याचे सुप्रिया सुळे यांनी पियुष

गोयल यांच्या लक्षात आणून दिले.

फोटोओळी—राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खासदार

सुनील तटकरे आणि फौजिया खान यांच्यासह रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची

भेट घेऊन विविध मागण्यांयाबाबत निवेदन दिले.

१३०२२०२१ बारामती—०२